HomeArchiveसोव्हरियन सुवर्ण रोखे...

सोव्हरियन सुवर्ण रोखे शुक्रवारपर्यंत!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारत सरकारने 9 ऑक्टोबर, 2020 रोजी जाहीर केलेल्या एका अधिसूचनेनुसार सोव्हरियन सुवर्ण रोखे योजना 2020-21 (मालिका सहावी)ची विक्री 12 ते 16 ऑक्टोबर, 2020पर्यंत खुली करण्यात येणार आहे.”
 
“या विक्रीचा हिशेब 20 ऑक्टोबर, 2020 रोजी पूर्ण होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या रोख्यांचे मूल्य खरेदीच्या कालावधीमध्ये प्रति ग्रॅम 5,051 (पाच हजार एक्कावन्न रूपये फक्त) असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल माध्यमाने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने निर्गम किंमतीवर प्रतिग्रॅम 50 रूपयांची (पन्नास रुपये फक्त) सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी रोख्यांचे मूल्य प्रति ग्रॅम 5,001 रुपये (पाच हजार एक रुपये फक्त) असणार आहे.”

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content