HomeArchiveसुशील मुरकर ठरला...

सुशील मुरकर ठरला `सावरकरश्री’!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि स्लीमवेलने अलीकडेच आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत सुशील मुरकर याने “सावरकर श्री २०२०”चा किताब पटकावला तर उपविजेतेपदी उमेश गुप्ताने स्थान पटकावले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात उत्तरोत्तर अटीतटीच्या रंगत गेलेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपले कसब पणाला लावले. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खासदार गजानन किर्तिकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, स्लीमवेलचे संचालक व बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे ज्येष्ठ संघटक पपी पाटील, योगिनी आशिष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटूंशी स्पर्धा करण्याइतकी क्षमता भारतीय स्पर्धकांमध्ये आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने अशाप्रकारचा उपक्रम सुरू करून त्या दिशेने प्रयत्न केले आहेत, ही एक चांगली बाब आहे, असे विचार खासदार किर्तिकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले. विविध गटांमधील स्पर्धकांचे कसब वाखाणण्याजोगे होते. अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची ही लढत ठरत होती. त्यानंतर जाहीर झालेल्या विजेत्यांना पारितोषिके तसेच स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.”
 
 
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content