HomeArchiveसीमांच्या इतिहास लेखनास...

सीमांच्या इतिहास लेखनास हिरवा झेंडा!

Details
सीमांच्या इतिहास लेखनास हिरवा झेंडा!

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विनय गजानन खरे..
 
 
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षं उलटून गेलीत. या काळात अनेक स्थित्यंतरे सर्वत्र पाहयला मिळाली तशी देशातही झाली. स्वातंत्र्य मिळताना ते तीन भूभागात मिळाले. एक तुकडा आताचा पाकिस्तान, एक पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश नि आपला भारत! हा तर इतिहास शाळेत शिकवला जातो, निरक्षरांना तो ऐकून माहिती असतो. फाळणीच्या कहाण्या नि त्या जखमा इतिहासात अजूनही पानांवर भळभळत वाहताहेत. तो इतिहास सांगणारे फार कमी जण या धरतीवर असतील. आजच्या पिढीला पानातून तो कळेल. पण, तो वाचायला वेळ नाही कोणाकडे!
  
 
तसंही आज वेगळेच प्रश्न प्रत्येकासमोर उभे आहेत. त्यामुळे इतिहासवाचन ही विरंगुळ्याची किंवा तद्दन फालतू बाब काहींना वाटते. शालेय अभ्यासक्रमात तो केवळ गुण मिळवण्याचा भाग झालाय किंवा इतिहास ‘स्कोरिंग सब्जेक्ट’ असल्याचे शिक्षक मुलांवर बिंबवतात. फार कमी मुलं लक्षपूर्वक त्याचे मनन, चिंतन करीत असावेत, इतकी या विषयाची उपेक्षा होऊ लागली आहे. अपवादात्मक स्थितीत मुलं इतिहास विषय घेऊन पुढे शिकतात. पण, काहींना चरितार्थाचे साधन म्हणून त्याची उपयुक्तता वाटत नाही. केवळ पदवीचे भेंडोळे इतकीच त्यांची मानसिकता असते. इतिहास, संस्कृती-संस्कार या बाबी पुढील पिढीकडे प्रवाही ठेवण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा, हे संचित नाहीसे होण्याच्या मार्गावर तर नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
 
 
अशा या भारतीय सीमांचा इतिहास हा बाह्यशक्तींच्याद्वारे लिहिला गेला. इतकेच नव्हे तर या सीमा कशा असाव्यात याची आखणीदेखील त्यांनीच केली. ब्रिटिश सरकारने याबाबत काहींना हे काम सोपवले होते. शेजारच्या शत्रू राष्ट्राची कोणती भूमी घ्यावी आदी बाबीही त्यांनीच ठरवल्या. भारत, पाकिस्तानमधील संबंध भविष्यातही चांगले राहू नयेत यासाठी बडे ब्रिटिश अधिकारी रेडक्लिफ यांना सीमा रेषा आखण्याचे काम दिले. मात्र, त्यांनी ते कधीच पूर्ण केले नाही. नंतरच्या काळात ते मॅक मोहन यांनी पूर्ण केले. यामुळेच देशाच्या विशेषतः पाकिस्तानकडील भागात आंतरराष्ट्रीय सीमा I B , नियंत्रण रेषा LOC नि मॅकमोहन या तीन सीमा आहेत हेदेखील अनेकांना नसेल माहित.
 
 
देशाच्या सीमांच्या इतिहास लेखनाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यात भारतीय इतिहास संशोधन परिषदेतील तज्ज्ञ, नेहरू स्मारक संग्रहालय नि वाचनालय, पुरातत्व विभागाचे महासंचालक, केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. सीमा इतिहासाचे हे काम वेगवेगळ्या प्रकारे करावे लागेल, हे स्पष्ट करीत यात सीमांचे आरेखन, सीमांमध्ये झालेले बदल, संरक्षण दलांची भूमिका, सीमावर्ती भागातील लोकांची मनोभूमिका, त्या भागाच्या सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक लोकजीवनवर परिणाम, अशा विविध घटकांचा विचार करण्याचे ठरले आहे. हा सविस्तर प्रकल्प आगामी दोन वर्षांत पूर्ण करायचा आहे.
 
 

 
 
 
या इतिहास लेखनाचे महत्त्व वेगळे असून त्यामुळे सीमा नि या प्रदेशातील समाजरचनेची सामान्य माणसाला नि या भागात काम करणाऱ्या बाह्य अधिकारी वर्गाला नीट माहिती होईल असे सिंह यावेळी म्हणाले. त्यांनी यावेळी आलेल्या सूचनांचे स्वागत करीत याबाबतच्या तपशीलची नोंद घेऊन कृती अहवाल करावा नि एक मोहीम म्हणून यावर काम करण्यास अधिकारी वर्गाला सांगितले. अशाप्रकारचा हा पहिलावहिला उपक्रम असल्याने लोकांना आपल्या राष्ट्रीय सीमांच्या संदर्भात माहिती तर मिळेलच, त्याचबरोबर सीमा भागाचे जीवन, तेथील अडचणी, इतर बाबी उलगडण्यास मदत मिळेल.”

 

 
 
विनय गजानन खरे..
 
 
“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षं उलटून गेलीत. या काळात अनेक स्थित्यंतरे सर्वत्र पाहयला मिळाली तशी देशातही झाली. स्वातंत्र्य मिळताना ते तीन भूभागात मिळाले. एक तुकडा आताचा पाकिस्तान, एक पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश नि आपला भारत! हा तर इतिहास शाळेत शिकवला जातो, निरक्षरांना तो ऐकून माहिती असतो. फाळणीच्या कहाण्या नि त्या जखमा इतिहासात अजूनही पानांवर भळभळत वाहताहेत. तो इतिहास सांगणारे फार कमी जण या धरतीवर असतील. आजच्या पिढीला पानातून तो कळेल. पण, तो वाचायला वेळ नाही कोणाकडे!”
  
 
“तसंही आज वेगळेच प्रश्न प्रत्येकासमोर उभे आहेत. त्यामुळे इतिहासवाचन ही विरंगुळ्याची किंवा तद्दन फालतू बाब काहींना वाटते. शालेय अभ्यासक्रमात तो केवळ गुण मिळवण्याचा भाग झालाय किंवा इतिहास ‘स्कोरिंग सब्जेक्ट’ असल्याचे शिक्षक मुलांवर बिंबवतात. फार कमी मुलं लक्षपूर्वक त्याचे मनन, चिंतन करीत असावेत, इतकी या विषयाची उपेक्षा होऊ लागली आहे. अपवादात्मक स्थितीत मुलं इतिहास विषय घेऊन पुढे शिकतात. पण, काहींना चरितार्थाचे साधन म्हणून त्याची उपयुक्तता वाटत नाही. केवळ पदवीचे भेंडोळे इतकीच त्यांची मानसिकता असते. इतिहास, संस्कृती-संस्कार या बाबी पुढील पिढीकडे प्रवाही ठेवण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा, हे संचित नाहीसे होण्याच्या मार्गावर तर नाही असे खेदाने म्हणावे लागेल.”
 
 
“अशा या भारतीय सीमांचा इतिहास हा बाह्यशक्तींच्याद्वारे लिहिला गेला. इतकेच नव्हे तर या सीमा कशा असाव्यात याची आखणीदेखील त्यांनीच केली. ब्रिटिश सरकारने याबाबत काहींना हे काम सोपवले होते. शेजारच्या शत्रू राष्ट्राची कोणती भूमी घ्यावी आदी बाबीही त्यांनीच ठरवल्या. भारत, पाकिस्तानमधील संबंध भविष्यातही चांगले राहू नयेत यासाठी बडे ब्रिटिश अधिकारी रेडक्लिफ यांना सीमा रेषा आखण्याचे काम दिले. मात्र, त्यांनी ते कधीच पूर्ण केले नाही. नंतरच्या काळात ते मॅक मोहन यांनी पूर्ण केले. यामुळेच देशाच्या विशेषतः पाकिस्तानकडील भागात आंतरराष्ट्रीय सीमा I B , नियंत्रण रेषा LOC नि मॅकमोहन या तीन सीमा आहेत हेदेखील अनेकांना नसेल माहित.”
 
 
“देशाच्या सीमांच्या इतिहास लेखनाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यात भारतीय इतिहास संशोधन परिषदेतील तज्ज्ञ, नेहरू स्मारक संग्रहालय नि वाचनालय, पुरातत्व विभागाचे महासंचालक, केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. सीमा इतिहासाचे हे काम वेगवेगळ्या प्रकारे करावे लागेल, हे स्पष्ट करीत यात सीमांचे आरेखन, सीमांमध्ये झालेले बदल, संरक्षण दलांची भूमिका, सीमावर्ती भागातील लोकांची मनोभूमिका, त्या भागाच्या सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक लोकजीवनवर परिणाम, अशा विविध घटकांचा विचार करण्याचे ठरले आहे. हा सविस्तर प्रकल्प आगामी दोन वर्षांत पूर्ण करायचा आहे.”
 
 

 
 
 
“या इतिहास लेखनाचे महत्त्व वेगळे असून त्यामुळे सीमा नि या प्रदेशातील समाजरचनेची सामान्य माणसाला नि या भागात काम करणाऱ्या बाह्य अधिकारी वर्गाला नीट माहिती होईल असे सिंह यावेळी म्हणाले. त्यांनी यावेळी आलेल्या सूचनांचे स्वागत करीत याबाबतच्या तपशीलची नोंद घेऊन कृती अहवाल करावा नि एक मोहीम म्हणून यावर काम करण्यास अधिकारी वर्गाला सांगितले. अशाप्रकारचा हा पहिलावहिला उपक्रम असल्याने लोकांना आपल्या राष्ट्रीय सीमांच्या संदर्भात माहिती तर मिळेलच, त्याचबरोबर सीमा भागाचे जीवन, तेथील अडचणी, इतर बाबी उलगडण्यास मदत मिळेल.”

पाकिस्तानबांगलादेशभारतइतिहाससंस्कृती-संस्कारभारतीय सीमांचा इतिहाससंरक्षण मंत्री राजनाथ सिंहआंतरराष्ट्रीय सीमा

Continue reading

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...
Skip to content