HomeArchiveसावरकर घराण्यातील तपस्विनींच्या...

सावरकर घराण्यातील तपस्विनींच्या स्मृतिनिमित्त रविवारी `अग्निशिखा’!

Details
सावरकर घराण्यातील तपस्विनींच्या स्मृतिनिमित्त रविवारी `अग्निशिखा’!

    01-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि नंदादीप समिती निर्मित तसंच रूमा क्रिएशन्स प्रस्तुत ‘अग्निशिखा’, हा सावरकर घराण्यातील तपस्विनी स्त्रियांवरील विशेष नाट्याविष्कार म्हणजेच २ डिसेंबर २०१८, या दिवशी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होत असून तो सर्वांसाठी खुला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर (माई), क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या पत्नी येसूवहिनी आणि डॉ. नारायणराव सावरकरांच्या पत्नी शांताबाई (ताई) सावरकर यांच्या एकत्रित स्मृतीदिनानिमित्त  या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

याचं लेखन व दिग्दर्शन अनघा काकडे यांचं असून अश्विनी कुलकर्णी, अनघा काकडे, पूर्वा देशपांडे, ओजस मराठे, यश पुरोहित हे कलाकार त्यात सहभागी होत आहेत. निशाद कल्याणकर यांचे संगीत संयोजन असून पार्श्वसंगीत कौस्तुभ देशपांडे यांचे आहे. नेपथ्य निश्चय इंगोले यांचे तर वेशभूषा व रंगमंच व्यवस्था अपूर्वा सोलापूरे पाहतील. प्रकाश योजना सचिन दुनाखे यांची आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी इच्छुकांनी 8879659770 किंवा 022-24465877 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणाऱ्या लाखो क्रांतिकारकांप्रमाणेच त्यांच्या घरच्यांचे, त्यांच्या माता, भगिनी, पत्नीचे भोगही चुकले नाहीत. हालअपेष्टा, कष्ट, मानहानी त्यांना सहन करावी लागली. सावरकर घराण्यातील तीन तपस्विनींबरोबरच या सर्वच वीरपत्नी, माता, भगिनींचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे, असं आवाहन स्मारकाच्या वतीनं करण्यात आलं आहे.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content