HomeArchive‘साध्वी’ आणि न....

‘साध्वी’ आणि न. मो. भक्ती!

Details
‘साध्वी’ आणि न. मो. भक्ती!

    22-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, हे ठामपणे सांगणार्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे कुणीही ऐकायला तयार नाही. साध्वीचा सरळधोपट अर्थ आचाराने, विचाराने शुद्ध असा होतो. जितकं पावित्र्य, तितकचं सूतकही येथे लागू पडतं. या साध्वींनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्याचं, किंबहुना भोपाळमधून त्यांची उमेदवारी रद्द करावी, असा आग्रह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यासह विरोधक बहुसंख्यांकांनी धरला तरी त्याचा आता काहीएक फायदा नाही. साध्वी प्रज्ञासिंह याच खर्याय देशभक्त, क्रांतिकारक असल्याचं प्रमाणपत्र दस्तुरखुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमोघ वाणीने दिलं आहे.

गेल्या पाच वर्षांत दलितांना, मुस्लिमांना, शोषितांना, वंचितांना, धर्मांधांच्या, जातंध्यांच्या टोळीने भरचौकात उभं करून फोडून काढलं. सरकारविरोधात बोलणारा कलाकार, साहित्यिक, राजकारणी, पत्रकार, विद्यार्थी, सामान्य माणूस अथवा अन्य कुणीही लागलीच देशद्रोही ठरला. अगदी त्याच्यावर खटला भरण्याच्या तयारीपर्यंत प्रकरणे गेली. माणूस मेला तरी चालेल पण, गायीला कुणी शिवायचंही नाही. ही समतावादी, समरसतावादी विचारांची राजवट चालवणारे नरेंद्र मोदी सरकार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारख्या सच्चा देशभक्त, माया, ममतेचं प्रेमाचं प्रतीक असलेल्या स्त्रीवरील अन्याय कसा सहन करतील? मोदीसाहेब पेटून उठले. हो, त्यांनी पटकन मौनही सोडलं आणि या साध्वींना संसदेत पाठविण्यासाठी भोपाळधून उमेदवारी जाहीर केली. पण, हे काँग्रेसवाले आणि विरोधक गप्प बसतील तेव्हाना? उठसुठ आपलं हेमंत करकरे यांच्यावरील विधानावरून साध्वी प्रज्ञा यांना आणि सरकारला कोचून-बोचून काढत आहेत.

भाजपाने महात्मा गांधी यांच्या मारेकर्याजलाही उमेदवारी दिली असती, असं एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी म्हणत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती असं आमचे अजितदादा पवार म्हणतात. पण, साध्वीचं हे असं बोलण साफ चुकीचं आहे, असा महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरही सांगत आहेत. त्यामुळे भाजपानेही अंग काढून घेत करकरेंविषयी साध्वीचं वैयक्तिक मत असावं, असं म्हटलं तर आहे. पण, नरेंद्र मोदींपुढे गेल्या पाच वर्षांत कुणाचं चाललं आहे, ते आता चालणार्याे जातीपासून मातीपर्यंत वाक्चातुर्यात वाकबगार पुरूष मोदींनी तर साध्वींना उमेदवारी देणारच, हा पण करून इतिहासाची पानेच्या पाने उलटून दाखवायला सुरूवात केली आहे.

याला म्हणतात सच्ची देशभक्ती. मोदींच्या भाषेत सांगायचं तर जगात गेल्या पाच हजार वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरेने ‘वसुधैव कुटुम्ब’ हा संदेश दिला. ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हा संदेश दिला. ज्या संस्कृतीने ‘एकम् सद् विप्रा: बहुधा वदन्ति’चा संदेश दिला. त्या संस्कृतीला तुम्ही (काँग्रेस नेते) दहशतवाद ठरवून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतिक असून काँग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत, ही साध्वी गर्जना शापापेक्षाही काँग्रेसला भारी पडू शकते. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या घरच्या भेदींनी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजपा हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? खरतरं भाजपा सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सूतक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे बोलत आहेत. पण, याचं मुंडेंना आणि राष्ट्रवादीला प्रज्ञासिंह शाप देऊ शकतात याची भीती कशी वाटत नाही? याआधीही भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी जनतेला बजावले आहे, ‘मला मते दिली नाहीत तर मी तुम्हाला शाप देईन,’. ही साधू, बुवा, बाबा आणि भक्तांची फळी भाजपा आणि मोदींकडे असतानाही ते वारंवार जाहीर प्रचारसंभामधून जनतेचा आशीर्वाद का मागतात हे आमच्या अजितदादांनाही न सुटलेलं कोडं आहे.

उठसुठ पवार, गांधींवर टीका करण्यापेक्षा उत्तर प्रदेशातून योगी महाराज, पंतजलीकडून रामदेवबाबा, साध्वी प्रज्ञासिंह, साध्वी उमा भारती, सोलापुरातून सिद्धेश्वर महाराज अशा साधू, साध्वींचा ताफा भाजपाने काढल्यास काँग्रेस आणि विरोधक एक फूक मारताच भस्म होतील. पाकिस्तानही भाजपाकडेही असलेल्या या साधूबाबांना घाबरून आहे. तरीही देशभर उठसुठ आपलं साध्वी, साध्वी सुरू आहे. जिथं मोदी साहेबांचा ‘जीती’ने विश्वास आहे तिथं कुणाचं चालायचं? साध्वींचं भोपाळमध्ये डिपॉझिट जप्त करण्याची ताकद ‘मतमाऊली’त आहे. पण, हेच मतदार जर साध्वींच्या शापाला घाबरतं असतील तर त्या उद्या जिंकून येतील आणि संसदेतही जातील. मग, ‘आता साधू, साध्वीचं राज्य येईल,’ अशी टीकाटिप्पणी करणार्याह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व देशवासीयांना याच राज्यात बर्याी बोलानं राहावं लागेल.

मोदी आणि त्यांच्या भक्त संप्रदायाने जर साध्वींना देशभक्त म्हटलं तर ते नक्कीचं खरं असेल. कारण देशातला कुठला माणूस देशद्रोही, देशभक्त, नक्षलवादी, पाकिस्तानी आहे, हे मोदींच केंद्रीय बोर्ड ठरवत असल्याने साध्वींची उमेदवारी रद्द करण्याच्या भानगडीत कुणी पडू नये किंबहुना त्यांच्या देशभक्तीवर शंका न घेतलेलीच बरी, असा फतवा मात्र निघाला आहे.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content