HomeArchiveसदानंद खोपकर यांच्या...

सदानंद खोपकर यांच्या “द्वारकाधीश’’ पुस्तकाचे बच्चू पांडेंकडून अभिवाचन!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेतर्फे मुंबईत दादरच्या सानेगुरूजी विद्यालयात ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सदानंद खोपकरलिखित ‘द्वारकाधीश’ या श्रीकृष्णाचे विविधअंगी दर्शन घडविणाऱ्या पुस्तकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम करण्यात आला. सुप्रसिद्ध निवेदक बच्चू पांडे यांनी कादंबरीचे अभिवाचन केले. त्याला रसिकांची चांगलीच दाद मिळाली.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई उपनगरचे अध्यक्ष शिवाजी गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृष्ण म्हणजे न उलगडणारं व्यक्तिमत्व असून त्याची विविध रूपं आणि नीती सदानंद खोपकर यांनी द्वारकाधीश, या कादंबरीत अचूक शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलाय. असंख्य बाण चुकविणाऱ्या कृष्णाला एका पारध्याचा बाण चुकवता आला नाही ही मृत्यूची क्रीडाच होय. या पुस्तकात नाट्यच नव्हे तर काव्यात्मक अनुभूती असल्याने आपल्याला तो खोपकर यांना कृष्णानं दिलेला दृष्टांतच वाटतो, असे ते म्हणाले.

याप्रसंगी मान्यवरांत कलाकार अविनाश वारंग, ज्येष्ठ रंगकर्मी राजा चव्हाण, गीतकार कमलाकर राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन कोमसाप, वांद्रे शाखाध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात सीमंतिनी खोपकर, शार्दूल महाडिक यांनी सहकार्य केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content