HomeArchive‘सज्जन’ नावाच्या दुर्जनाची...

‘सज्जन’ नावाच्या दुर्जनाची कथा!

Details
‘सज्जन’ नावाच्या दुर्जनाची कथा!

    19-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगली प्रकरणी तब्बल ३४ वर्षांनंतर सज्जनकुमार नावाच्या दुर्जनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दंगलीत दिल्लीत तब्बल २,७३३ शिखांची हत्त्या झाली. याप्रकरणी सत्र न्यायालयाने सज्जनकुमार आणि त्यांच्या पाच हस्तकांना निर्दोष सोडले होते. पण उच्च न्यायालयाने या गुन्ह्याचे वर्णन ‘`Crime against humanity’’ engineered by politicians with assistance from the police. पोलिसांच्या मदतीने राजकारण्यांनी घडवून आणलेला ‘मानवतेविरूद्धचा गुन्हा’, अशा शब्दात करीत सज्जन कुमारसह इतर पाच जणांनादेखील दोषी ठरविले आहे. हे गुन्हेगार दोन दशकांहून अधिककाळ शिक्षेपासून दूर राहिले, असे म्हणत न्यायालयाने म्हटले आहे की, ‘नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्ली आणि इतरत्र झालेले शिखांचे हत्त्याकांड म्हणजे मानवतेविरूद्धचा गुन्हा असल्याचे या न्यायालयाचे मत आहे.’
दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिराजींच्या अंगरक्षकाने त्यांची गोळ्या झाडून हत्त्या केली. त्यानंतर दि. १ ते ४ नोव्हेंबर या काळात दिल्लीत शिखांचे हत्त्याकांड झाले. मे २००० मध्ये या दंगलींशी संबंधित असलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याकरिता नानावटी आयोग नेमण्यात आला.

दरम्यान, डिसेंबर २००२ मध्ये सज्जनकुमार यांना क्लिन चिट देत सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले. पण नानावटी आयोगाच्या सूचनेनंतर दि. २४ ऑक्टोबर २००५ रोजी सीबीआयने त्यांच्याविरूद्ध खटला दाखल केला. २०१० मध्ये कनिष्ठ न्यायालयाने सज्जनकुमार यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करून घेतले. तथापि, दि. ३० एप्रिल २०१३ रोजी सज्जनकुमार आणि इतर तिघांना निर्दोष सोडण्यात आले. दि. ९ मे रोजी कोर्टाने खोखर, बागमल आणि लाल यांना जन्मठेपेची तर यादव आणि किशन खोखर यांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. दि. १९ जुलै रोजी सीबीआयने उच्च न्यायालयात अपिल केले. दि. १७ डिसेंबर रोजी न्यायालयाने सज्जनकुमार यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अशाप्रकरे न्यायदानाचे एक वर्तूळ पूर्ण झाले. दुर्जनांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली. पण ही शिक्षा अंतिम कशी म्हणता येईल? ही मंडळी सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. शिवाय अशा खटल्यात निर्दोष सुटण्यासाठी ‘कालहरण’ हा नामी उपाय असतो. म्हणूनच Justice delayed is Justice denied. (न्यायाला उशीर म्हणजे न्यायास नकार) असे म्हटले जाते. शिख हत्त्याकांडाला ३४ वर्षे होऊन गेली आहेत.

या काळात अनेक साक्षीदार मरण तरी पावले असतील अथवा इतरत्र निघून गेले असतील. अनेक पुरावे नष्ट झाले असतील. या पार्श्वभूमीवर सुप्रिम कोर्टाने आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण ‘खुदाके घर में देर है अंधेर नही।’ असे म्हणतात. या खटल्यात सुप्रिम कोर्टातदेखील याची प्रचिती यावी हीच अपेक्षा!!”
 

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content