HomeArchiveसंगीत सभेच्या माध्यमातून...

संगीत सभेच्या माध्यमातून विद्वय पलुस्करांना आदरांजली

Details
संगीत सभेच्या माध्यमातून विद्वय पलुस्करांना आदरांजली

    14-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो 
 
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर यांना संगीत सभेच्या माध्यमातून नुकतीच आदरांजली दिली गेली. ग्वाल्हेर घराण्याचे बुजूर्ग गायक पंडित गजाननबुवा जोशी यांची नात अपूर्वा गोखले यांनी ग्वाल्हेर घराण्याची खासियत दाखवित आपली कला सादर केली.
 
त्यांनी गायनाची सुरूवात राग मिया की तोडीने केली. त्यात पारंपारिक बडा ख्याल सब तीस बरजोरी करत (झुमरा ताल) व द्रूत अल्ला जाने (त्रिताल) हे सादर केले. नंतर अल्हैया बिलावल रागात दोन रचना सादर केल्या. (मध्यम झपताल) प्रबल ही श्याम अब आमि तराणा (त्रिताल) दीम् दीम् तन देना या तराण्याचे वैशिष्ट्ये असे की, अंतऱ्यामध्ये पर्शियन भाषेतील बोल होते. नंतर हिंडोल रागात दोन रचना सादर केल्या.
 
(मध्यम त्रिताल) पैंजणिया मोरी बाजत लागी आणि त्रिताल तराणा द्रेद्रे तननन तदरे तरारे यांच्या अंतऱ्याला तबल्याचे बोल समाविष्ट होते. मध्यंतरानंतर त्यांनी राग भैरव बहार गायला. यातील दोन्ही रागांचे उत्कृष्ट मिलन करत रागाची बढत केली. रचना होत्या बडा ख्याल (तिलवाडा ताल) निंदरिया व द्रूत (त्रिताल) डालरिया. नंतर राग सामंत सारंगमध्ये दोन रचना सादर केल्या. (त्रिताल) रे मारो पिया आमि सौची कहत. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता त्यांनी भैरवी रागातील त्यांच्या आत्यांनी बांधलेल्या बंदिशीने केली. बोल होते (त्रिताल) जसोदा तेरो लाल देखो मानत नाही.
 
अत्यंत निकोप व सुरेल आवाज. त्यात सुरेख आकारात व गोल आलापाने केलेली बढत बोल आलाप वबोल यांनी परिपूर्ण ग्वाल्हेर घराण्याची खासियत दाखवित सरगमयुक्त तानांचा माफक वापर, तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज व द्रूत आणि अतिद्रूत ताना यांचा सुरेख वापर ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. त्यांना संवादिनीवर साथ दिली सिद्धेश बिचोलकर यांनी, तर तबल्यावर अभय दातार यांची साथ होती. या दोघांच्या उत्कृष्ट साथीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.-”

केएचएल न्यूज ब्युरो 
 
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर यांना संगीत सभेच्या माध्यमातून नुकतीच आदरांजली दिली गेली. ग्वाल्हेर घराण्याचे बुजूर्ग गायक पंडित गजाननबुवा जोशी यांची नात अपूर्वा गोखले यांनी ग्वाल्हेर घराण्याची खासियत दाखवित आपली कला सादर केली.
 
“त्यांनी गायनाची सुरूवात राग मिया की तोडीने केली. त्यात पारंपारिक बडा ख्याल सब तीस बरजोरी करत (झुमरा ताल) व द्रूत अल्ला जाने (त्रिताल) हे सादर केले. नंतर अल्हैया बिलावल रागात दोन रचना सादर केल्या. (मध्यम झपताल) प्रबल ही श्याम अब आमि तराणा (त्रिताल) दीम् दीम् तन देना या तराण्याचे वैशिष्ट्ये असे की, अंतऱ्यामध्ये पर्शियन भाषेतील बोल होते. नंतर हिंडोल रागात दोन रचना सादर केल्या.”
 
(मध्यम त्रिताल) पैंजणिया मोरी बाजत लागी आणि त्रिताल तराणा द्रेद्रे तननन तदरे तरारे यांच्या अंतऱ्याला तबल्याचे बोल समाविष्ट होते. मध्यंतरानंतर त्यांनी राग भैरव बहार गायला. यातील दोन्ही रागांचे उत्कृष्ट मिलन करत रागाची बढत केली. रचना होत्या बडा ख्याल (तिलवाडा ताल) निंदरिया व द्रूत (त्रिताल) डालरिया. नंतर राग सामंत सारंगमध्ये दोन रचना सादर केल्या. (त्रिताल) रे मारो पिया आमि सौची कहत. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता त्यांनी भैरवी रागातील त्यांच्या आत्यांनी बांधलेल्या बंदिशीने केली. बोल होते (त्रिताल) जसोदा तेरो लाल देखो मानत नाही.
 
“अत्यंत निकोप व सुरेल आवाज. त्यात सुरेख आकारात व गोल आलापाने केलेली बढत बोल आलाप वबोल यांनी परिपूर्ण ग्वाल्हेर घराण्याची खासियत दाखवित सरगमयुक्त तानांचा माफक वापर, तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज व द्रूत आणि अतिद्रूत ताना यांचा सुरेख वापर ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. त्यांना संवादिनीवर साथ दिली सिद्धेश बिचोलकर यांनी, तर तबल्यावर अभय दातार यांची साथ होती. या दोघांच्या उत्कृष्ट साथीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.-“

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content