HomeArchiveशेक्सपिअर अमर रहे!...

शेक्सपिअर अमर रहे! भाग-३

Details
शेक्सपिअर अमर रहे! भाग-३

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संजय डहाळे, ज्येष्ठ नाटय समीक्षक

शेक्सपिअरच्या मिडसमर नाइटस् ड्रीमवरून एक मॉड-मॉड व मॅड मॅड कॉमेडी ही रत्नाकर मतकरी यांनी लिहीली. जादू तेरी नजर हे बारसं केलं. ते २००५ साली रंगभूमीवर सुयोगन आणलं होतं. मंगेश कदम याचं दिग्दर्शन आणि प्रशांत दामले याची प्रमुख भूमिका होती. सतीश तारे त्यात होताच. पण त्याच्यामुळेच पुढे ५०० प्रयोगानंतर नाटक थांबवावं लागलं. तो एक स्वतंत्र विषय ठरेल. असो. त्यात शेक्सपिअरची महती ही मतकरी यांनी शब्दबद्ध केली होती. ती अशी. कोण्याकाळी इंग्लंडामधी होता एक शायर

नाव जयाचे जगी गाजले विल्यम शेक्सपिअर!

भव्य अन उत्कट प्रेम करावे, जसे रोमिओ ज्युलिएट

कधी हसोनी म्हणे, प्रेमिका, तू भोळा रे खुळचट.

मिडसमराच्या स्वप्नी करते जादू तेरी नजर

नाव जयाचे जगी गाजले विल्यम शेक्सपिअर!

शेक्सपिअर रंगमंचावर आला..

शेक्सपिअरमय नाटक मंडळी असतांनाच (अर्थात काही जरूर अपवाद!) नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या रंगयात्री या नाटकाची आठवण जागी झाली. १९९६ च्या

सुमारास हे नाटक छबिलदास रंगमंचावर सादर झाल्याचे आठवते. जुनं छबिलदास या नाटकात नाटककार गज्वी यांनी चक्क शेक्सपिअरला रंगभूमीवर आणल होतं. दीपक जाधव या गुणी कलावंताने त्यात ही मध्यवर्ती भूमिका केली होती. प्रुफुल्लचंद्र दिघे यांच्या कलाकृती या संस्थेने या हटके प्रायोगिक नाटकाची जुळवाजुळव व निर्मिती केली होती. डॉ. गिरीश ओक या नाटकात विवेकची भूमिका करीत होते. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट नाट्यदर्पण पुरस्कार जो अभिनयासाठी प्रायोगिक नाटकाला देण्यात येतो. तो डॉक्टरांना मिळाला. मॅजेस्टिकने त्याची संहिताही प्रकाशित केली आहे. पण म्हणावं तेव्हढं हे  नाट्यप्रकाशात येऊ शकलं नाही. राज्य नाट्यस्पर्धा, संगीत नाटक अकादमी यांच्या पायऱ्यापर्यंत नाटक पोहचलं खरं, पण यश मात्र मिळू शकलं नाही. केवळ चर्चेत राहीलं.

या नाटय़लेखनाबद्दल स्वत: गज्वी म्हणतात, मी काही शेक्सपिअरचा फॅन नव्हे. पण, हा नाटककार माझ्या नाटय़विषयाला अत्यंत पोषक ठरला. मराठी रंगभूमीवर शेक्सपिअरचा प्रभाव प्रचंड आहे. त्याची सर्व नाटके मराठी भाषेत उपलब्ध आहेत. रंगयात्रीच्या निमित्ताने  शेक्सपिअरचा अभ्यास मला करता आला. हा आनंद अर्थातच मोठा आहे. माझा नाटयानुभव शेक्सपिअरमुळं मला व्यक्त करता आला. शेक्सपिअर मी तुझा ऋणी आहे.!!

नाटककार गज्वी यांचं रंगयात्री हे प्रायोगिक नाट्य मध्यंतरी एका कार्यशाळेत अभिवाचनासाठी घेतलं होतं. त्यातली काव्यत्मक भाषा ही लय अन् ताल हा हळुवारपणे जपणारी असल्याने अभिवाचनाचे जणू नाटयच आकाराला आले. नाटय कलाकारांची शोकांतिका यापूर्वी अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककारांनी उभ्या केल्या. पण रंगयात्रीत विवेक नावाचा रंगकर्मी हा थेट शेक्सपिअरशी संवाद साधतो. हा प्रकार विलक्षणच म्हणवा लागेल. लेखनात व नाटयाच्या मांडणीत असणारी गती ही यातली जमेची बाजू. `होय, मीच देऊ शकतो न्याय’ असं म्हणत डॉ. गिरीश ओक (म्हणजे कलाकार विवेक) पटकन स्क्रिप्ट उचलतो आणि त्यावर शेक्सपिअर हा जागीच थिजून  जातो. हा नाटकाचा सर्वोच्च बिंदू आहे. `सृजनता निरागस बालकासारखी असते, जी अंकुरते प्रतिभेच्या जोरावर!’ हा विचार पडदा पडला तरी मनात खोलवर घुमत राहातो… हे नाटककार गज्वी यांचे यशच!

आजवर नाटककार म्हणून गज्वी यांनी विविधरंगी लेखन केले. आव्हानात्मक विषय हाताळले. एकांकिका ते व्यावसयिक नाटकं असा त्यांचा चढता आलेखच. या आलेखात रंगयात्री एक नाटककार म्हणून प्रायोगिक वळण आहे. जे विसरून चालणार नाही. ज्याची नोंद मराठी नाटयइतिहासात ठळकपणे घेतली जाईल. शेक्सपिअर जिवंत आहे. हेच खरे!”
 
“संजय डहाळे, ज्येष्ठ नाटय समीक्षक

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content