HomeArchiveशेअर बाजारात सलग...

शेअर बाजारात सलग १०व्या दिवशी तेजी

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“वित्तीय क्षेत्राच्या पुढाकारामुळे काल शेअर बाजाराने सलग १०व्या दिवशी दिवसभर पिछाडी घेत अखेरीस बुल रन स्थिती दर्शवली. अखेरच्या तासात बाजाराने विशेष गती घेतली. निफ्टी ५०ने दुपारी २ वाजेनंतर ११० अंकांची वृद्धी घेतली व तो ०.३१ टक्क्यांची वृद्धी घेत ११,९७१ अंकांवर स्थिरावला. तर सेन्सेक्सने या काळात ३८७ अंकांची वृद्धी घेतली व बाजार बंद होताना तो ०.४२ टक्क्यांच्या वृद्धीसह ४०,७९४ अंकांवर स्थिरावला.”
 
“एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने मोरॅटोरियमप्रकरणी अनुकूल निकाल दिल्यानंतर बँकिंग स्टॉक्स वधारले. या निकालामुळे बँकिंग स्टॉक्सवरील विश्वासावर भर पडली. परिणामी बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.”
  

 
“टॉप गेनर्स: सेन्सेक्समधील नफ्याचे नेतृत्त्व बजाज फिनसर्वने ३.८७%ने तर बजाज फायनान्सने ३%नी केले. त्यानंतर आयसीआयसीआय बँक (२.६९%), इंडसइंड बँक (२.३४%) आणि एसबीआय (२.२५%)चा क्रमांक लागला. दुसरीकडे निफ्टी-५०मध्ये बजाज फिनसर्व (३.९६%), एसबीआय लाइफ इन्शुरन्स (३.०६%) आणि बजाज फायनान्स (३.०४%) हे अग्रेसर होते. एलअँडटी (२.०९%), टाटा स्टील (१.९५%) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (१.८९%) हे सर्वाधिक लाभदायकांपैकी ठरले.”
 
“टॉप लूझर्स: निफ्टीमध्ये नुकसानीत विप्रोने सर्वाधिक घाटा पत्करला. आजच्या व्यापारात कंपनीचे स्टॉक्स ६.७८%नी घसरले. एनटीपीसी, ओएनजीसी, कोल इंडिया आणि पॉवर ग्रिडवेअर हेदेखील बाजार बंद होताना अनुक्रमे ४.३%, ३.०४%, २.९% आणि २.१२%नी घसरले. ते सेन्सेक्समध्येही टॉप लूझर्स ठरले. टेक महिंद्रा (२.१३%), इन्फोसिस (१.८९%), आणि एचसीएल टेक्नोलॉजीज (१.१५%) यांनी आयटी क्षेत्रानंतर घसरण अनुभवली. नेस्लेने बीएसईवर ०.०१ टक्क्याची घट घेऊन स्थिरसदृश स्थिती अनुभवली.”
  

 
“व्हॉल्यूम: निफ्टी, विप्रो, एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि एसबीआय हे सर्वाधिक व्यापार झालेले स्टॉक्स ठरले. नेस्ले इंडिया आणि श्री सिमेंट हे गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले.”
 
जागतिक बाजार: अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात उदासीनता दिसून आली. केओएसपीआय आणि एसएसई कॉम्पोसाइट अनुक्रमे ०.९४% आणि ०.५६%नी घसरले. हँगसेंग आणि निक्केई अनुक्रमे ०.०७% व ०.११%ची वृद्धी घेत हिरव्या रंगात स्थिरावले.
 
डॉलर विरुद्ध रुपया: ७३.३७ ते ७३.४०च्या दरम्यान प्रचंड प्रतिकार झेलत रुपयाने अमेरिकी डॉलरविरुद्ध ३४ पैशांची वृद्धी घेतली. रुपया अखेरीस ७३.२९ रुपये मूल्यावर स्थिरावला.

Continue reading

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...
Skip to content