HomeArchiveशिवसेनेला पट(क)वले!

शिवसेनेला पट(क)वले!

Details
शिवसेनेला पट(क)वले!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सुटलेला बाण आणि सुटलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. पण शिवसेना आणि भाजपाने सोमवारी ते करून दाखवले. परस्परांवर केलेल्या जहाल, तिखट टीकेचे बाण दोन्ही पक्षांनी लिलया परत घेतले, भात्यात बंद केले आणि गळ्यात गळेही घातले. जे काही २०१४ पासून बोलले गेले होते ते कडू जहर अपशब्दांचे, शेलक्या विशेषणांचे मानभंग करणारे घोटही गिळले. शब्द मागे घेतले, सारे काही जाजमाखाली सारले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो वृत्तवाहिन्यांच्या कॅमऱ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राला, देशाला तोंड भरून हसूनही दाखवले. ‘भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.. उगाच हसतो उगाच रूसतो.. कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे..’ या गाण्याचे शब्द या घडामोडींसाठी अगदी चपखल ठरावेत.

याच गाण्यात आणखी काही शब्द आहेत. कधी आतूर, कधी कातर.., पण ते लिहिले तर आतूर, कातूर हे सत्तेसाठी सत्तातूर झालेले, असे कुणी चिंतातूर क्षुद्र जंतू म्हणू शकतात. वास्तविक हा निर्णय तळागाळातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी घेतला गेला आहे. केवळ सत्ता-पदे यापेक्षाही सर्वसामान्यांच्या हिताचा व्यापक विचार करून शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र आले आहेत हा जो काही उदात्त आणि प्रबोधनपर विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे तो विरोधी पक्षांनीही समजून घेण्याची गरज आहे. ते सोडून विरोधी पक्ष म्हणतात की, शिवसेनेला इडीची भीती दाखवून भाजपाने पटवले आहे. सत्ता मिळणार नाही यामुळे चिडलेल्या विरोधी पक्षांचे हे चिमखडे बोल आहेत. जी भाजपा आणि अमित शाह शिवसेनेला पटकवण्याची भाषा बोलत होते त्यांना शिवसेनेला अशी भीती दाखवून पटवण्याची गरजच काय? दोन्ही पक्षांनी जनतेच्या भल्याचा विचार केला, ही उदात्त भूमिका विरोधी पक्षांच्या पचनी कधी पडणार हा खरा प्रश्न आहे.

जनतेच्या भल्यासाठी या दोन्ही पक्षांच्या धीरोदात्त नेत्यांनी काय काय म्हणून जाजमाखाली सारले आहे, विसरण्याचा प्रयत्न केला आहे याची उदाहरणे कितीतरी आहेत. अफझलखानाची स्वारी, पहारेकरीच चोर आहे, गाजरांची शेती आणि अशा कितीतरी शब्दांचे आसूड कडाडले होते. पण भाजपाने मोठ्या मनाने ते दुर्लक्षिले आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना अलिंगन दिले हे अवघ्या देशाने पाहिले. सारे मतभेद आता संपले आहेत, नाणार, राम मंदिर, देशाची सुरक्षा या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आहोत, असे अमित शाह यांनीच सांगितले.

देशासाठी इतका त्याग भाजपाने केला. देशासाठी सैनिकांनी आहुती दिली असताना भाजपानेही रागलोभांची आहुती दिली. फडणवीस यांनी मातोश्रीवर धाव घेऊन शिवसेनेलाही ‘समजावलं’. अर्थात देशहिताच्या व्यापक दृष्टिकोनातून. उद्धव यांना हा व्यापक दृष्टीकोन पटला असावा त्याशिवाय युती झालीच नसती. हा देश, राज्य मजबूत करण्यासाठी आम्ही या वळणावर एकत्र आलो आहोत. तमाम हिंदू या क्षणाची वाट पाहात होता, असे जाज्ज्वल्य शब्द यामुळेच त्यांनी अभिमानाने उच्चारले. वळण, नवीन सुरुवात, पुढचं पाऊल या त्यांच्या प्रत्येक शब्दांत अर्थ ठासून भरला आहे. ५० वर्षे ज्यांच्याशी संघर्ष करत आलो त्याच लोकांच्या हाती सत्ता द्यावी का? हा त्यांचा प्रश्न तत्त्व अधोरेखित करणारा आहे. ज्यांना हे समजलेले नाही ते आधी शिवसेना असं बोलत होती, तसं फुत्कारत होती आणि आता कशी युती झाली, वगैरे प्रश्न विचारत राहतील. पण भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवतील, असे निदान या घटकेचे वर्तमान आहे. त्यांचे जागावाटपाचे सूत्र तर ठरले आहे. लोकसभेसाठी भाजपाला शिवसेनेची राज्यात साथ अत्यावश्यक वाटत होती. यामुळेच शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढून भाजपाने युती पदरात पाडून घेतली आहे. विधानसभेसाठी मात्र २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते. तेव्हा कदाचित पुन्हा शिवसेनेला अपेक्षित जागावाटप वाट्याला आले नाही तर अफझल खान, कुंभकर्ण, चोर, थापाड्या अशा बाणांची आठवण होऊ शकते. देशात भाजपाविरोधात विरोधी पक्ष आघाडी उभे करत असताना आणि जनमतही बदलल्याची झलक विधानसभा निवडणुकांतून मिळाल्यावर भाजपाने राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर व्यापक विचार करून शिवसेनेला चुचकारणे सद्यस्थितीत उचित मानले असावे. शिवसेनेलाही ते हवे होते याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बदललेल्या वक्तव्यांनी दिली होतीच. या युतीमुळे कोटी कोटी कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली आहे, असे उद्धव आणि अमित शाह आता म्हणत असले तरी या दोघांनी परस्परांच्या मागण्यांची पूर्तता कशी केली त्याचा रहस्यभेद लोकांसाठी अधिक रंजक आणि सुरस असेल हे नक्की!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content