HomeArchiveशालेय टेबल टेनिस...

शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिद्धांत देशपांडेला सुवर्णपदक!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबई विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या लोढा वर्ल्ड स्कूलच्या सिद्धांत देशपांडे याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावले. सिद्धांतने अंतिम फेरीत आशय यादव याचा पराभव केला. सिद्धांत देशपांडे ठाणे येथील पिनॅकल अकादमीत समीर सारळकर व प्रदीप मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलने सुवर्णपदक पटकावले.
 
 
“महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणेद्वारा ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आर्य क्रीडा मंडळ ठाणे येथे नुकत्याच या स्पर्धा खेळविण्यात आल्या. या स्पर्धा अनुक्रमे १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली तसेच सांघिक गटात खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत नवी मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगर, कल्याण-डोंबिवली, पालघर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पनवेल आणि रायगड या १३ विभागांमधील ७८ शाळांमधील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून प्रत्येक वैयक्तिक गटातील पहिले ३ खेळाडू तर प्रत्येक गटातील विजेता संघ राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत.”

 
वैयक्तिक निकाल
 
“१४ वर्षांखालील मुली– पर्ल अमलसाडीवाला (विजेती), आर्या सोनगडकर (उपविजेती)”
“१७ वर्षांखालील मुली– टिया वाघ (विजेती), श्रावणी सावंत (उपविजेती)”
“१९ वर्षांखालील मुली– तेजल कांबळे (विजेती), रिया सुर्यवंशी (उपविजेती)”
“१७ वर्षांखालील मुले– मोहित शेजावळे (विजेता), ऋत्विक नागले (उपविजेता)”
“१९ वर्षांखालील मुले– सिद्धेश सावंत (विजेता), शिवम दास (उपविजेता)”
 
सांघिक निकाल
 
“१४ वर्षांखालील मुली– ठाणे शहर संघ (विजेता), मुंबई शहर संघ (उपविजेता)”
“१७ वर्षांखालील मुली– मुंबई उपनगर संघ (विजेता), ठाणे शहर संघ (उपविजेता)”
“१९ वर्षांखालील मुली– मुंबई उपनगर संघ (विजेता), मुंबई शहर संघ (उपविजेता)”
“१४ वर्षांखालील मुले– नवी मुंबई संघ (विजेता), मुंबई उपनगर संघ (उपविजेता)”
“१७ वर्षांखालील मुले– नवी मुंबई संघ (विजेता), कल्याण-डोंबिवली संघ (उपविजेता)”
“१९ वर्षांखालील मुले– ठाणे ग्रामीण संघ (विजेता), मुंबई शहर संघ (उपविजेता)”

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content