HomeArchiveविविध लोककलांचे दर्शन...

विविध लोककलांचे दर्शन घडविणारा `गजर माय मराठी’

Details
विविध लोककलांचे दर्शन घडविणारा `गजर माय मराठी’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विविध लोककलांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम `गजर माय मराठीचा’ विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नुकताच सादर झाला. या कार्यक्रमाची निर्मिती विजय तावडे व सुहास भागवत यांनी केली. प्रमुख अतिथी नितीन तिवारी तसेच संपादिका, प्रकाशिका, लेखिका, लता गुठे, लेखक अभिनेते प्रकाश राणे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ख्यातनाम शाहीर नंदेश उमप यांच्या आवाजातील पोवाड्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन संदीप डावरे यांनी अप्रतिम केले.

नृत्यदिग्दर्शक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन झाले. त्यामध्ये कोळीनृत्य,  शेतकरी भारूड, वासुदेवाची गाणी, जात्यावरील ओव्या तसेच मंगळागौर व अशाच अनेक कार्यक्रमाचे सुरेख पद्धतीने आयोजन केले होते. यामध्ये खास आकर्षण होते ते लावणीचे. सुप्रसिद्ध लावणी कलाकार आकांक्षा कदम, मेघाश्री महिंद्रकर, वैशाली गोखले, रूपाली पाटील,  विकास कदम, प्राजक्ता माहुलकर व इतर कलाकारांनी हा कार्यक्रम अतिशय उंचीवर नेऊन ठेवला.

कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन केले होते तुषार सावंत यांनी. नृत्य दिग्दर्शक शशिकांत जाधव यांनी अनेक लोककलातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक व पारंपरिक कलांचे मोहक दर्शन घडविले. संकल्पना जयेश तावडे यांची होती. संयोजक अरविंद सांगळे होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.”
 
“विविध लोककलांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम `गजर माय मराठीचा’ विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नुकताच सादर झाला. या कार्यक्रमाची निर्मिती विजय तावडे व सुहास भागवत यांनी केली. प्रमुख अतिथी नितीन तिवारी तसेच संपादिका, प्रकाशिका, लेखिका, लता गुठे, लेखक अभिनेते प्रकाश राणे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ख्यातनाम शाहीर नंदेश उमप यांच्या आवाजातील पोवाड्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन संदीप डावरे यांनी अप्रतिम केले.

नृत्यदिग्दर्शक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन झाले. त्यामध्ये कोळीनृत्य,  शेतकरी भारूड, वासुदेवाची गाणी, जात्यावरील ओव्या तसेच मंगळागौर व अशाच अनेक कार्यक्रमाचे सुरेख पद्धतीने आयोजन केले होते. यामध्ये खास आकर्षण होते ते लावणीचे. सुप्रसिद्ध लावणी कलाकार आकांक्षा कदम, मेघाश्री महिंद्रकर, वैशाली गोखले, रूपाली पाटील,  विकास कदम, प्राजक्ता माहुलकर व इतर कलाकारांनी हा कार्यक्रम अतिशय उंचीवर नेऊन ठेवला.

कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन केले होते तुषार सावंत यांनी. नृत्य दिग्दर्शक शशिकांत जाधव यांनी अनेक लोककलातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक व पारंपरिक कलांचे मोहक दर्शन घडविले. संकल्पना जयेश तावडे यांची होती. संयोजक अरविंद सांगळे होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.”
 
Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content