HomeArchiveविधानसभेत डावलल्यास स्वतंत्र...

विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

Details
विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.
 
कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.
 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.”

 
“कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.”

 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
“याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content