HomeArchiveविद्यार्थ्यांपासून शिक्षकांसाठी विविध...

विद्यार्थ्यांपासून शिक्षकांसाठी विविध स्पर्धा!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघाच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासून अभूतपूर्व अशा मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. पालक, शिक्षक व मराठी शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पालक संमेलनाला मिळत आला आहे. यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने येत्या १८ ते २१ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे. यानिमित्ताने मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठीप्रेमी पालक महासंघ व आम्ही शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळांतील शिक्षक, पालक, शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट यांच्यासाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला, व मीम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.”
 
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यातील निवडक साहित्याला ‘मराठी प्रथम’ या ई-नियतकालिकात प्रसिद्धीही देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा मराठी भाषेत होणार असून जास्तीतजास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे संमेलनाच्या स्पर्धा समितीकडून आवाहन करण्यात येत आहे.
 
स्पर्धेचे गट व विषय पुढीलप्रमाणे-
 
१) शिक्षक-
 
वक्तृत्व- ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणातील आव्हाने
निबंध- ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणातील माझे प्रयोग
 
२) पालक-
 
वक्तृत्व- कोरोनाकाळात शाळा घरात आली आणि..
निबंध- कोरोनाकाळ आणि पाल्याच्या शिक्षणातील माझा सहभाग
 
३) शालेय विद्यार्थी-
 
वक्तृत्व- टाळेबंदीतील शाळेच्या आठवणी..
निबंध- मला ऑनलाईन शिक्षण आवडते का?
चित्रकला- माझी घरातली शाळा
 
४) महाविद्यालयीन विद्यार्थी-
 
वक्तृत्व- माझी मराठी शाळा मला आवडते कारण..
निबंध- माझी मराठी शाळा अशी हवी..
मीम- मराठी शाळेचे मारेकरी
 
५) खुला गट-
 
वक्तृत्व- मराठी शाळांसाठी शासनाने काय करायला हवे?
निबंध- मराठी शाळांसाठी मी काय करू शकतो?
मीम- मराठी शाळेचे मारेकरी
 
“सदर स्पर्धांसाठी साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०२० असून मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या शेवटच्या दिवशी या स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी सांगितले.”
 
स्पर्धा समन्वयक- सुशील शेजुळे (९६०४५२३६६६)

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content