HomeArchiveवाचावं असं काही.....

वाचावं असं काही.. दिवाळी भाग-६ हेमांगी

Details
वाचावं असं काही.. दिवाळी भाग-६ हेमांगी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महेश पवार

[email protected]

प्रवास, एैतिहासिक, आरोग्य, साहित्य, कथा, कविता, अर्थ,चित्रपट, शताब्दी स्मरण आदी विविध विषयांनी हेमांगी हा दिवाळी अंक सजला आहे. हेमांगीचे संपादक प्रकाश कुलकर्णी गेली ४३ वर्षं अविरतपणे वाचकांच्या हाती हा सर्वांगीण अंक सोपवित आहेत. पुष्पा जोशी यांनी लिहिलेल्या वैभवशाली विजयनगरची राजधानी हंपी हे जरी प्रवासवर्णन असले तरी त्यातून गतकालीन एैतिहासिक वैभवाची माहिती मिळते. या लेखापासून सुरूवात झालेल्या हेमांगीचा अंक प्रत्येक पानागणिक उत्सुकता वाढवतो. उन्मेश वाघयांनी लिहीलेला अकथ कहानी प्रेम की, कुछ कही न जाएया लेखातून संपूर्ण कैलास मानसरोवराची आखों देखी यात्रा घडवून आणली आहे. हा लेख वाचताना प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहतो. भारतातील होम-स्टे पर्यटन: सध्याची स्थिती आणि भविष्यातील संधी या संग्राम गायकवाड यांच्या लेखातून देशातल्या विविध राज्यांमध्ये असलेल्या उत्तमोत्तम होम-स्टेबद्दल माहिती मिळते.

विद्यापीठ : चरित्र आणि चारित्र्य घडविणारे या सुषमा शाळीग्राम यांच्या लेखामधून उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी येथील विवेकानंद विद्यापीठाची सर्वांगीण माहिती वाचकांना मिळते. १९७६ साली अमेरिकेत सुरू झालेल्या या विदयापीठाची इमारत १९९१ साली एक एकर जागेत उभी राहिली. हे विद्यापीठ व्यावसायिक वा आर्थिक लाभाविना चालणारी संस्था.स्वामी विवेकानंद यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण यावर या संस्थेचा भर आहे. धार्मिक धर्मकांडाऐवजी प्रत्येक व्यक्तीच्या आंतरिक आणि आध्यात्मिक विकासावर भर द्यावा, भारतीय वेदान्तानुसार लोकसेवा, समाजसेवा यासाठी काम करायला उद्युक्त करावे. सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे सोपवावा हा याविद्यापीठाचा मुख्य विचार आणि हेतू. अमेरिकेतील भारतीयांच्या लहान मुला-मुलींमध्ये भारतीयत्व रूजविण्याचे कार्य या विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. या लेखाबद्दल सुषमा शाळीग्राम यांना धन्यवाद देणे अगत्याचे ठरते.

डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांनी आपल्या त्यासी अंकुशाचा मारया लेखातून २००३ ते २०१६ या आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत वादळी ठरलेल्या कालखंडाचा धांडोळा घेतला आहे. डॉ. डी. वाय.  रेड्डी, डॉ. दुवुरी सुब्बाराव आणि डॉ. रघुराम राजन या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नेतृत्त्व करणाऱ्या  तिन्ही माजी गव्हर्नरांबद्दल आणि त्यांच्या ध्येय धोरणाबद्दलचा आढावा घेतला आहे. याबद्दल इथे लिहीण्याऐवजी वाचकांनी याबद्दलथेट हेमांगीच वाचायला हवा. होलोकास्ट या उद्य कुलकर्णी यांच्या लेखातून जर्मनी, हिटलर, गॅस चेंबर प्रकरण यांच्याशी निगडीत असलेल्या चित्रपटांचा आढावा घेतला आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा शिडलर्स लिस्ट, पोलंडमधील वार्सा येथील झूचा संचालक झानझाबीनस्की आणि त्याची पत्नी यांनी ज्यूंना झूमध्ये लपवून ठेवून अनेक ज्यूंचे प्राण वाचवले. त्यावर आधारीत द झूकीपर्स वाइफ, द प्रॉनब्रोकरया चित्रपटांचा त्यात उल्लेख आहे. २०१६ साली आलेला डिनायल, २००८ साली आलेला व्हॅलकिरी, २००४ साली आलेला डाऊनफॉल या तीन्ही चित्रपटांचे कथानक आणि त्याची पार्श्वभूमी उद्य कुलकर्णी यांनी आपल्या लेखातून विषद केली आहे.

आरोग्य विभागात डॉ. आशुतोष दिवाण यांचा बदलत्या वैद्यकीय पर्यावरणातील धोके आणि डॉ. सुभाष बेन्द्रे यांचा औषधे घेताना गोलमाल नको! हे दोन्ही लेख वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले बदल आपल्या लक्षात आणून देतात. तसेच, डॉक्टरांनी दिलेल्या सूचना का पाळाव्यात याबद्दलही मार्गदर्शन करतात. ग.दि.मा.,सुधीर फडके, पु.ल. यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. वाचनात ओलल्या बव्हंशी सर्वच दिवाळी अंकाच्या संपादकांनी यासंदर्भात विविध मान्यवरांचे लेख त्यांच्या त्यांच्या दिवाळी अंकात प्रसिध्द केले आहेत.हेमांगीही त्याला अपवाद नाही. रवि प्रकाश कुलकर्णी यांनी अशी त्रयी पुन्हा न होणेया लेखातून या त्रयींच्या आठवणी शब्दबध्द केल्या आहेत. तर, अरूण पुराणिक यांनी चित्रपट संगीतातील ध्रुवतारा या लेखात बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्याबद्दल लिहीलेला लेख वाचनीय आहे.

सुप्रिया देवस्थळी या सध्या कंट्रोलर ऑफ अकाउंट्स म्हणून डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल आणि ट्रेनिंग, दिल्ली येथे कार्यरत आहे. स्पर्धा परिक्षांचे महाजाल या लेखामधून स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देतात. त्याबद्दल अधिक मार्गदर्शन करतात. प्रशासनातला मराठी ठसा वाढला पाहिजे असे सांगतानाच त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी समाजातील जबाबदार घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचं मतही त्या व्यक्त करतात. यासोबतच रामदास भटकळ यांचा आतला आवाज, दिलीप चावरे यांचा किरो यांची भविष्यवाणी : भारताची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही, अर्पणा लव्हेकर यांचा उपेक्षा प्रतिभावंत स्त्रियांची, संजीवनी खेर यांचा नव्या वाटा शोधणारी साहित्यिका – इस्मत चुगताई,  मनोज आचार्य यांचा आधुनिक मीरा आदी लेखही वाचनीय आहेत. वसंत वाहोकर, शैलजा पुरोहित, अ‍ॅड. शफी काझी, अरुण सावळेकर, सुरेश वांदिले, उज्ज्वला केळकर यांच्या कथाही वाचनीय आहेत.

हेमांगी

संपादक : प्रकाश कुलकर्णी

मुखपृष्ठ : पुंडलिक वझे

किंमत : १५० रूपये”
 
“महेश पवार

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content