HomeArchiveवर्सोव्यातून पुन्हा एकदा...

वर्सोव्यातून पुन्हा एकदा आमदार डॉ. भारती लव्हेकर!

Details
वर्सोव्यातून पुन्हा एकदा आमदार डॉ. भारती लव्हेकर!

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
वर्सोवा विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर हे सामाजिक चळवळीतून उदयास आलेले राजकीय नेतृत्त्व आहे. त्यांनी राजकीय पदाकडे साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहत समाजातील दुर्लक्षित समस्यांना जागृतीच्या माध्यमातून वैधानिक मंचावर ठेवले. तसेच शासनाला समस्या निवारणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास सहकार्य करत सामाजिक विकासाच्या जडणघडणीत आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.
 
 
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे माजी आमदार बलदेव खोसा यांचा पराभव करून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपाच्या तिकिटावर सुमारे २६ हजार मताधिक्याने निवडून आल्या. २०१४पूर्वी वर्सोवा विधानसभेत भाजपाचे अस्तित्त्व नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत वर्सोवा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे सर्वत्र जाळे पसरवले. प्रभाग क्रमांक ६०मधून नगरसेवक म्हणून योगिराज दाभाडकर व प्रभाग क्रमांक ६३मधून नगरसेविका म्हणून रंजना पाटील यांना निवडून आणले. खासदार गजानन कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी त्यांनी स्वतःला प्रचारात त्यांनी झोकून दिले होते.
 
 
डॉ. लव्हेकर या उच्चशिक्षित आमदार असून त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए., एमफील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पत्रकारितेत पदवी आणि समान नागरी कायद्यात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. डॉ. लव्हेकर यांच्या डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेच्या लोकचळवळीतील अभूतपूर्व यशाबद्दल २० जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन खास गौरव केला होता.
 
 

 
 
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जनगणनेत स्त्रियांची आकडेवारी कमी झाली होती. आमदार लव्हेकर यांनी स्त्री-पुरूष विषमतेच्या समस्येला गांभीर्याने घेऊन सामाजिक चळवळीत हे प्रमाण समाधानकारक स्थितीत आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल त्यांना आहिल्याबाई होळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“वर्सोवा विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर हे सामाजिक चळवळीतून उदयास आलेले राजकीय नेतृत्त्व आहे. त्यांनी राजकीय पदाकडे साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहत समाजातील दुर्लक्षित समस्यांना जागृतीच्या माध्यमातून वैधानिक मंचावर ठेवले. तसेच शासनाला समस्या निवारणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास सहकार्य करत सामाजिक विकासाच्या जडणघडणीत आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.”
 
 
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे माजी आमदार बलदेव खोसा यांचा पराभव करून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपाच्या तिकिटावर सुमारे २६ हजार मताधिक्याने निवडून आल्या. २०१४पूर्वी वर्सोवा विधानसभेत भाजपाचे अस्तित्त्व नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत वर्सोवा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे सर्वत्र जाळे पसरवले. प्रभाग क्रमांक ६०मधून नगरसेवक म्हणून योगिराज दाभाडकर व प्रभाग क्रमांक ६३मधून नगरसेविका म्हणून रंजना पाटील यांना निवडून आणले. खासदार गजानन कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी त्यांनी स्वतःला प्रचारात त्यांनी झोकून दिले होते.
 
 
“डॉ. लव्हेकर या उच्चशिक्षित आमदार असून त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए., एमफील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पत्रकारितेत पदवी आणि समान नागरी कायद्यात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. डॉ. लव्हेकर यांच्या डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेच्या लोकचळवळीतील अभूतपूर्व यशाबद्दल २० जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन खास गौरव केला होता.”
 
 

 
 
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जनगणनेत स्त्रियांची आकडेवारी कमी झाली होती. आमदार लव्हेकर यांनी स्त्री-पुरूष विषमतेच्या समस्येला गांभीर्याने घेऊन सामाजिक चळवळीत हे प्रमाण समाधानकारक स्थितीत आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल त्यांना आहिल्याबाई होळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content