Friday, October 18, 2024
HomeArchiveरिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना मोफत...

रिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना मोफत विमा कवच!

Details
रिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना मोफत विमा कवच!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सलग ५ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने सोमवारी ऑटोरिक्षा व टॅक्सी वाहतूकदारांसाठी संघटनेचे मोफत सदस्यत्व, रूपये १ लाख रकमेचा विमा तसेच मोफत नेत्रचिकित्सा व चष्मा देण्यात आला.

संघटनेचे कुर्ला येथील “उद्धवगड”, या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईसह राज्यातील जास्तीतजास्त ऑटोरिक्षा-टॅक्सी वाहनचालक, मालकांनी या संधीचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा वाहतूक कामगार नेते हाजी अरफात शेख यांनी केले. स्वतः पहिला फॉर्म भरत त्यांनी स्वतःचे डोळे तपासून घेतले. यावेळी हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांनी या शिबराचा फायदा घेत फॉर्म भरले. नवभारतीय शिववाहतूक संघटना ही भाजपाप्रणित वाहतूकदारांची संघटना असून वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणारी संघटना म्हणून ओळखली जाते.
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content