HomeArchiveराहुल शेवाळे यांचा...

राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदित्य ठाकरे

Details
राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदित्य ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईतले शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या रॅलीत, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सामील झाले. यावेळी ‘राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीला भरभरून मते मिळतील″ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तर “गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या झंजावातामुळे आम्ही जास्तीतजास्त जनतेपर्यंत पोहोचलो असून विजय निश्चित आहे” अशी प्रतिक्रिया उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिली.

यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश फातर्फेकर, तुकाराम काते, महिला विभाग संघटिका रिटा वाघ, श्रद्धा जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, आरपीयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे, कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुमारे 4 वाजता दादर परिसरात, राहुल शेवाळे यांच्या रॅलीत सहभागी झाले. यावेळी, “ही निवडणूक गल्लीची किंवा केवळ शहराची नसून देशाची निवडणूक आहे. त्यामुळे एनडीएला जास्तीतजास्त जागा मिळून शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सरकार देशात येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भव्य रॅली सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रॉम्बे कोळीवाडा येथून सुरू झाली. शेकडो बाईक आणि चारचाकी वाहने घेऊन महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते. ट्रॉम्बे येथून निघालेली ही रॅली देवनार, चेंबूर, चुनाभट्टी, सायन सर्कल, गुरू तेग बहाद्दूर नगर, अँटॉप हिल, वडाळा, महेश्वरी उद्यान, खोदादाद सर्कल, परळ टी. टी., एल्फिन्स्टन, प्रभादेवी, सेनाभवन, माटुंगा लेबर कॅम्प येथून धारावी येथे दाखल झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे ही रॅली मतदारसंघातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. अखेर धारावी येथे या रॅलीची सांगता झाली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content