HomeArchiveराष्ट्रवादी पुन्हा!

राष्ट्रवादी पुन्हा!

Details
राष्ट्रवादी पुन्हा!

    28-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी..
 
‘घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात’. सकंटांचा एकएक करून ससेमिराही आपल्यामागे लागतो. परंतु, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संकटांचाही एक असा कर्दनकाळ आहे, ज्याचं नाव आहे शरद पवार. वय वर्ष ७९. तरूणाईला लाजवेल अशी अफाट ऊर्जा, लढवय्या बाणा, नीडर अन् तितकाच शांत व सयंमी स्वभाव. आपल्यावर टिकाटिप्पणी करणाऱ्यांना ते शब्दानेही दुखावणार नाहीत. परंतु, त्यांना कोंडीत, खिंडित गाठण्याचा प्रयत्न करणार्यांनेही पश्चातापाने आपल्याच डोक्यावर हात मारून घ्यावा. सक्तवसुली संचलनालय ‘ईडी’चंही असंच काहीसं झालं असावं. कथित राज्य शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याची दुर्बुद्धी ‘ईडी’ला सुचली खरी पण, याच ‘ईडी’चा पाहुणचार पवार यांनी खुल्या दिलाने कबूल केला. पण, ईडीला काही त्यांचा पाहुणचार करणे झेपलं नाही.
 
‘ईडी’चा सन्मान राखून शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी आपण, स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असंही पवारांनी ठरवलं होतं. परंतु, चौकशीसाठी हजर राहा, असं ईडीचं समन्स काही त्यांच्यापर्यंत आलं नाही. आता तूर्तास चौकशीची गरज नाही, भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही, असं पत्र किंवा ई-मेल ईडीकडून पवारांना आला असेल तर ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्हच. चौकशी ईडीमार्फत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव बर्वे यांना दूत बनवून कुणी आणि का बरं पाठवावं, महाराष्ट्रात सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जात नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केला आहे. परंतु, विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना ईडीच्या निमित्ताने ‘पवार फिव्हर’चा महाताप सरकारने का बरं घ्यावा, शरद पवारचं ‘ईडी’ची चौकशी करायला निघाल्याने मरगळलेल्या राष्ट्रवादीलाही बळ मिळावं.
 
शरद पवार यांचे आज, आता आणि उद्या काय, हे राजकारण सबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे. परंतु, शिखर बँक घोटाळ्यात पवारांचं नाव संचालकांत नसताना ‘ईडी’ने सुतावरून ‘शिखर’ गाठण्याची घाई केली का, शरद पवार यांचे खंदे शिलेदार एकएक करून भाजपयुक्त झाले. मात्र आव्हानांचं नाव शरद पवार. ८०व्या वर्षाकडे झुकलेला हा उमदा तरूण राज्यभर दौरे करून सभांवर सभांवर सभा घेत फिरतो आहे. सोडून गेलेल्यांना पाणी पाजण्याची रांगडी भाषा करतो आहे, यावरून त्यांना खिंडित गाठणार्यां नी अंदाज बांधायला हवा होता. ५२ वर्षे राजकारण कोळून, उकळून आणि गाळून प्यायलेल्या या तरूणाचं कर्करोगही जिथं वाकडं करू शकला नाही, तिथं हाडामासांच्या माणसाचं काय?
 
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ईडीच्या र्चाकशीला सामोरे गेले. याच राज ठाकरेंचे काका व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांचा कायम उल्लेख तेल लावलेला पैलवान असा करत. त्याचा उलगडा २०१५ साली शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज यांनी केला होता. जे पवार एका असाध्य आजाराच्या हाती लागले नाहीत. ते एक वेगळ्या प्रकारचं महाराष्ट्राचं रसायन आहे. पवार खुश झाले तरी भीती वाटायला लागते. आणि त्यांनी स्तुती केली तरी मी काय केलं, असा प्रश्न मनात घोळतो. खरंतरं २३ ते २७ स्पटेंबर या पाच दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीसं घडलयं-बिघडलयं. ईडीला पीडा न म्हणता सरकार, पोलीस आणि ईडीसमोरील अडचणी वाढत गेल्या. कायदा-सुव्यवस्था आड आली. पुन्हा शरद पवारांभोवती राज्याचं राजकारण फिरू लागलं. हे घडत असताना राष्ट्रवादीने असंतोषाचा वणवा विझू न देण्याची पुरेपूर दक्षता घेतली.
  
शरद पवार या नावाभोवती असलेल्या वलयाचा दिल्ली ते गल्ली लाभ राष्ट्रवादीने उठवला. सत्ताधारी शिवसेना आणि सपा, काँग्रेस व विरोधी पक्ष पवारांच्या बाजूने उभे राहिले. घोटाळेबाजीत छगन भुजबळांना ईडीचा दोन वर्षांहून अधिक काळ कारावास भोगावा लागला. पण, तुरूंगाबाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी आलेली सहानुभूतीची लाट आपण पाहिलीच आहे. पण, शरद पवार नावाचं आयतं कोलित कुणी कुणाच्या हातात दिलं, याची चर्चा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येईपर्यंत होतच राहील. पण, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर ईडी कार्यालयाकडे न जाता शरद पवार थेट पुण्याकडे रवाना झाले. ते का तर, पुण्यातील पूरग्रस्तांची भेट घ्यायला. त्यांच्याशी संवाद साधायला. यावरून पवार कोणतं रसायन आहे, याचा अंदाज बांधावा.”

“विनोद साळवी..
 
“‘घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात’. सकंटांचा एकएक करून ससेमिराही आपल्यामागे लागतो. परंतु, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संकटांचाही एक असा कर्दनकाळ आहे, ज्याचं नाव आहे शरद पवार. वय वर्ष ७९. तरूणाईला लाजवेल अशी अफाट ऊर्जा, लढवय्या बाणा, नीडर अन् तितकाच शांत व सयंमी स्वभाव. आपल्यावर टिकाटिप्पणी करणाऱ्यांना ते शब्दानेही दुखावणार नाहीत. परंतु, त्यांना कोंडीत, खिंडित गाठण्याचा प्रयत्न करणार्यांनेही पश्चातापाने आपल्याच डोक्यावर हात मारून घ्यावा. सक्तवसुली संचलनालय ‘ईडी’चंही असंच काहीसं झालं असावं. कथित राज्य शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याची दुर्बुद्धी ‘ईडी’ला सुचली खरी पण, याच ‘ईडी’चा पाहुणचार पवार यांनी खुल्या दिलाने कबूल केला. पण, ईडीला काही त्यांचा पाहुणचार करणे झेपलं नाही.”
 
“‘ईडी’चा सन्मान राखून शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी आपण, स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असंही पवारांनी ठरवलं होतं. परंतु, चौकशीसाठी हजर राहा, असं ईडीचं समन्स काही त्यांच्यापर्यंत आलं नाही. आता तूर्तास चौकशीची गरज नाही, भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही, असं पत्र किंवा ई-मेल ईडीकडून पवारांना आला असेल तर ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्हच. चौकशी ईडीमार्फत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव बर्वे यांना दूत बनवून कुणी आणि का बरं पाठवावं, महाराष्ट्रात सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जात नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केला आहे. परंतु, विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना ईडीच्या निमित्ताने ‘पवार फिव्हर’चा महाताप सरकारने का बरं घ्यावा, शरद पवारचं ‘ईडी’ची चौकशी करायला निघाल्याने मरगळलेल्या राष्ट्रवादीलाही बळ मिळावं.”
 
“शरद पवार यांचे आज, आता आणि उद्या काय, हे राजकारण सबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे. परंतु, शिखर बँक घोटाळ्यात पवारांचं नाव संचालकांत नसताना ‘ईडी’ने सुतावरून ‘शिखर’ गाठण्याची घाई केली का, शरद पवार यांचे खंदे शिलेदार एकएक करून भाजपयुक्त झाले. मात्र आव्हानांचं नाव शरद पवार. ८०व्या वर्षाकडे झुकलेला हा उमदा तरूण राज्यभर दौरे करून सभांवर सभांवर सभा घेत फिरतो आहे. सोडून गेलेल्यांना पाणी पाजण्याची रांगडी भाषा करतो आहे, यावरून त्यांना खिंडित गाठणार्यां नी अंदाज बांधायला हवा होता. ५२ वर्षे राजकारण कोळून, उकळून आणि गाळून प्यायलेल्या या तरूणाचं कर्करोगही जिथं वाकडं करू शकला नाही, तिथं हाडामासांच्या माणसाचं काय?”
 
“काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ईडीच्या र्चाकशीला सामोरे गेले. याच राज ठाकरेंचे काका व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांचा कायम उल्लेख तेल लावलेला पैलवान असा करत. त्याचा उलगडा २०१५ साली शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज यांनी केला होता. जे पवार एका असाध्य आजाराच्या हाती लागले नाहीत. ते एक वेगळ्या प्रकारचं महाराष्ट्राचं रसायन आहे. पवार खुश झाले तरी भीती वाटायला लागते. आणि त्यांनी स्तुती केली तरी मी काय केलं, असा प्रश्न मनात घोळतो. खरंतरं २३ ते २७ स्पटेंबर या पाच दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीसं घडलयं-बिघडलयं. ईडीला पीडा न म्हणता सरकार, पोलीस आणि ईडीसमोरील अडचणी वाढत गेल्या. कायदा-सुव्यवस्था आड आली. पुन्हा शरद पवारांभोवती राज्याचं राजकारण फिरू लागलं. हे घडत असताना राष्ट्रवादीने असंतोषाचा वणवा विझू न देण्याची पुरेपूर दक्षता घेतली.”
  
“शरद पवार या नावाभोवती असलेल्या वलयाचा दिल्ली ते गल्ली लाभ राष्ट्रवादीने उठवला. सत्ताधारी शिवसेना आणि सपा, काँग्रेस व विरोधी पक्ष पवारांच्या बाजूने उभे राहिले. घोटाळेबाजीत छगन भुजबळांना ईडीचा दोन वर्षांहून अधिक काळ कारावास भोगावा लागला. पण, तुरूंगाबाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी आलेली सहानुभूतीची लाट आपण पाहिलीच आहे. पण, शरद पवार नावाचं आयतं कोलित कुणी कुणाच्या हातात दिलं, याची चर्चा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येईपर्यंत होतच राहील. पण, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर ईडी कार्यालयाकडे न जाता शरद पवार थेट पुण्याकडे रवाना झाले. ते का तर, पुण्यातील पूरग्रस्तांची भेट घ्यायला. त्यांच्याशी संवाद साधायला. यावरून पवार कोणतं रसायन आहे, याचा अंदाज बांधावा.”

शरद पवारईडीमुंबईचे पोलीस आयुक्त संजीव बर्वेशिखरराज ठाकरेशिवसेनासपाकाँग्रेस

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content