HomeArchiveराणेंचे राजकारण आणि...

राणेंचे राजकारण आणि झालेली गोची!

Details
राणेंचे राजकारण आणि झालेली गोची!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
स्वत:स कोकणाचे भाग्यविधाते म्हणविणारे माजी शिवसेना नेते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांचे राजकारण म्हणजे राज्यात विनोदाचा आणि टवाळकीचा विषय झाला आहे. शिवसेना व्हाया काँग्रेस असे फिरलेले राणे सध्या भाजपाचे खासदार आहेत. मात्र नेते आहेत ते त्यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचे याला काय म्हणायचे? आता तर राणे स्वबळाची भाषा करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढविणार आहे, अशी गर्जना करून भाजपालाच त्यांनी आव्हान दिले आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे राणे योग्यवेळी भाजपाची साथ सोडणार असा होतो. राणेंसारख्या नेत्याने अशा गप्पा मारणे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना पटत नाहीत. किती वेळा पक्ष बदलायचा आणि कशासाठी असा सवाल राणेंच्या जवळच्या साथीदारांना पडला आहे.

भाजपामध्ये न जाताही भाजपाच्या खात्यावर खासदारकी खिशात घातली. ते दिल्लीच्या राजकारणात पोहोचले. मात्र एव्हढयाने प्रश्न सुटले नाहीतच. कारण दोघा चिरंजीवांचे राजकीय पुनर्वसनही अतिशय महत्त्वाचे आहे. थोरल्या लेकास खासदारकी हवी आणि धाकटया मुलास विधानसभेची आमदारकी हवीच. आमदार निलेश राणे हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. पुढील निवडणूक ते महाराष्ट्र स्वाभिमान या घरच्या पक्षातर्फे लढवतील हे उघड आहे. माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढतील. त्यांना दुसरा मतदारसंघ नाही. भाजपाने याच मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना मैदानात उतरविण्याचे ठरविले होते. मात्र प्रभू आता नाही म्हणत आहेत. भाजपा-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. युती होणारच असे भाजपातर्फे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे राणेंसमोर संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे निलेश राणेंना स्वबळावर लढावे लागणार. मात्र जिंकण्यासाठी हवे असलेले बळ म्हणजेच राजकीय वातावरण राणेंना अनुकूल नाही. त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यंतरी राणेंची घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीचा अर्थ वेगळा काय असू शकतो? ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेस ती राणेंसाठी सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे निलेश यांचा लोकसभेचा मार्ग आता सोपा नाही. मात्र पवारांचा मदतीने तरी ती जागा जिंकता येईल काय, असं गणित नारायण राणेंचे आहे. काँग्रेसमध्ये १२ वर्षे, त्याआधी शिवसेनेत सुमारे ३५ वर्षे आणि आता भाजपाचा आधार घेऊन राणेंचे राजकारण सुरू आहे. मात्र भाजपाकडून आता अधिक काहीच मिळणार नाही याची पुरेपूर खात्री झाल्याने राणेंनी आता स्वाभिमानांचा झेंडा फडकविला आहे. विश्वास यात्रा सुरू केली आहे. वातावरण काय असे कसे आहे, याचा अंदाज ते घेत आहेत. भाजपामध्ये राहून आता फारसं काही हाती लागणार नाही, हे ओळखूनच राणे आता स्वबळाची भाषा ऐकवित आहेत. भाजपाला राणेंची नव्हे तर शिवसेनची कधी नव्हे, ती गरज आहे. मोदी लाट नाही की शाहांचे कौतुक नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता हवी तर शिवसेना हवीच, अशी विचित्र परिस्थिती भाजपासमोर आहे. शिवसेना नकोशी झाली आहे तरी दुसरा पर्याय नाही. राष्ट्रवादीची मैत्री भरोशाची नाही, हे भाजपाने अनुभवले आहेच. कितीही टीका झाली, उपमर्द झाला, मानहानी झाली, तरी शिवसेना भाजपासाठी टॉनिक आहे. ते दिल्लीतील सत्ता टिकवण्यासाठी. इतके स्वच्छ आहे. तरीही दोन्ही बाजूंनी प्रहार होत आहेत, होत राहतील..

शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवायची आहे. राज्यभर भाजपाचा झझांवात आहे. मग मुंबईवर भाजपाचा झेंडा का नाही या प्रश्नाचे उत्तर नको असलेल्या युतीत आहे. भाजपा-शिवसेना आता एकत्रच आहेत. विधानसभा निवडणुकीत १५० जागांची मागणी शिवसेना करेल आणि त्याच अटीवर लोकसभा युती राहील. राणेंच्यामागे दहा आमदारही नाहीत. राणेंना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतील. त्यातच भाजपाने त्यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. महाराष्ट्रातून हा मान फक्त रोणेंनाच मिळाला आहे. त्यामुळे राणेंची आता गोची झाली आहे..”
 
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content