HomeArchiveराज की बात!

राज की बात!

Details
राज की बात!

    23-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com 
 
‘धर्मा’ या जुन्या चित्रपटात बिंदू प्राणला एका कव्वालीतून म्हणते, राज की बात कहदू तो जाने महफिल में क्या हो.., राज ठाकरे आणि त्यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, ही अशीच रंगलेली मैफल कम चौकशी. आपल्याकडे सर्वांना लागलेली वाईट सवय अशी की, व्यवहार मग ते कोणत्याही मालमत्तेचे असोत त्यात काळा व्यवहार झाला नाही असे कधीही घडत नाही. त्यामुळे कोहिनूरप्रकरणी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी झालेले व्यवहार त्यातून घडलेले गैरव्यवहार ईडीच्या हाती आले. आयते कोलीत त्यांना सापडले. त्यातून नको ते घडले, ज्या एकमेव विरोधकाच्या नुसत्या भाषणाने सत्ताधारी युतीला घाम फुटायचा, लोकसभा निवडणुकीदरम्यान घुमलेला हा राजआवाज ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थंडावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले एकमेव राज ठाकरे यावेळी ऐकायला मिळण्याची शक्यता अजूनही प्रश्नांकित आहे.
 

एकदा का अमुक एखाद्या व्यवहारात विशेषतः मालमत्तेच्या देवाणघेवाणीत काळा पैसा तमुक एखाद्या कुटुंबात आला की त्या काळ्या पैशांचे पांढरे झटपट करण्याची वाईट सवय भारतीयांना असते आणि तेथेच आम्ही अडकतो. ईडीच्या हाती ठाकरे कुटुंबाचे त्यांच्या कोहिनूर प्रकरणातील शिरोडकरसारख्या मित्रांचे नेमके याच पद्धतीचे पुरावे हाती आल्याने राज आणि मित्रपरिवाराला ही चौकशी कठीण जाईल, अशी माझी माहिती आहे. आज जे शिवसेना किंवा भाजपामध्ये दाखल झाले आहेत ते जवळपास सारेच या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळ्या व्यवहारात गुंतलेले. शासकीय अधिकारी किंवा सरकारी कंत्राटदार तसेच दलाल तर खूपच पुढे रांगेत आहेत. पण, सध्यातरी ते सेफ असल्याने सरकारच्या तिजोरीत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा जमा होईल असे दूरदूरपर्यंत दिसत नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले मोठे नीच आणि चतुर असतात.
 
 
या राज्यात थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मराठी माणसाने बघावे ते राज ठाकरे एकतर मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर खूप वर्षांनी पूर्वीच्या जोशात, जोमात लोकसभा निवडणूक प्रचारात दिसले. नेमका त्यांचा आवाज लगेचच काही महिन्यांत दिसेनासा होणे, मनापासून वाईट वाटते. असे घडायला नको होते. राज यांच्यापुढे काळ्या व्यवहारात कितीतरी पुढे असलेले या राज्यातले अनेक, पण संकट केवळ राज यांच्यावर ओढवले तेही वाईट वाटले. पीएमएलए हा कायदाच काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना रोखणारा आहे. त्यात किमान तीन वर्षे जामीनदेखील मिळत नाही. त्यामुळेच या राज्यातले, या देशातले आजपर्यंत काळा पैसा पांढरा करणारे शासकीय, प्रशासकीय अधिकारी, नेते, शासकीय दलाल आणि कंत्राटदार धास्तावलेले आहेत. अर्थात कोणीतरी हा कायदा राबविण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले होते. ते मोदी सरकारने केले. आज त्या-त्या नेत्यांच्या फॉलोअर्सना वाईट वाटते. पण, हे घडणे अत्यावश्यक होते. एकदाचे घडायला लागले.
 
 

 
 
 
ईडी ही देशातील सर्वाधिक शक्तिशाली तपासयंत्रणा. त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडणे म्हणजे जवळपास रस्त्यावर येणे असे आहे. ईडी तपासाची मोठी किंमत कशी मोजावी लागते ते भुजबळ कुटुंबाबाबतीत आपण यापूर्वी बघितले आहेच. प्रश्न एकच मनाला पडतो की, टप्प्याटप्प्याने नवश्रीमंत यात अडकतील की आश्रयाला गेले असल्याने सुटतील. ते एक गूढ आहे. मात्र, असे घडले आणि राज्यातले भामटे जर आश्रयाला गेल्याने सुटले तर विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. लोकांच्या मनातून ते उतरतील. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ईडीला अमुक एखाद्याला अटक करण्याचे थेट अधिकार आहेत. जेथे जामीन देण्यासाठी प्रसंगी न्यायालयेदेखील कचरतात. केवळ राज ठाकरे किंवा उन्मेष जोशी यांची ईडीने जरी चौकशी केलेली असली तरी आणखी काही मंडळींची त्यात पुढे चौकशी होणार असल्याची माझी माहिती आहे, ज्याची संबंधितांना कल्पना आलेली असल्याने अनेक चौकशीच्या धाकाने धास्तावलेले आहेत.”

 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com 
 
“‘धर्मा’ या जुन्या चित्रपटात बिंदू प्राणला एका कव्वालीतून म्हणते, राज की बात कहदू तो जाने महफिल में क्या हो.., राज ठाकरे आणि त्यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, ही अशीच रंगलेली मैफल कम चौकशी. आपल्याकडे सर्वांना लागलेली वाईट सवय अशी की, व्यवहार मग ते कोणत्याही मालमत्तेचे असोत त्यात काळा व्यवहार झाला नाही असे कधीही घडत नाही. त्यामुळे कोहिनूरप्रकरणी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी झालेले व्यवहार त्यातून घडलेले गैरव्यवहार ईडीच्या हाती आले. आयते कोलीत त्यांना सापडले. त्यातून नको ते घडले, ज्या एकमेव विरोधकाच्या नुसत्या भाषणाने सत्ताधारी युतीला घाम फुटायचा, लोकसभा निवडणुकीदरम्यान घुमलेला हा राजआवाज ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थंडावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले एकमेव राज ठाकरे यावेळी ऐकायला मिळण्याची शक्यता अजूनही प्रश्नांकित आहे.”
 

“एकदा का अमुक एखाद्या व्यवहारात विशेषतः मालमत्तेच्या देवाणघेवाणीत काळा पैसा तमुक एखाद्या कुटुंबात आला की त्या काळ्या पैशांचे पांढरे झटपट करण्याची वाईट सवय भारतीयांना असते आणि तेथेच आम्ही अडकतो. ईडीच्या हाती ठाकरे कुटुंबाचे त्यांच्या कोहिनूर प्रकरणातील शिरोडकरसारख्या मित्रांचे नेमके याच पद्धतीचे पुरावे हाती आल्याने राज आणि मित्रपरिवाराला ही चौकशी कठीण जाईल, अशी माझी माहिती आहे. आज जे शिवसेना किंवा भाजपामध्ये दाखल झाले आहेत ते जवळपास सारेच या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळ्या व्यवहारात गुंतलेले. शासकीय अधिकारी किंवा सरकारी कंत्राटदार तसेच दलाल तर खूपच पुढे रांगेत आहेत. पण, सध्यातरी ते सेफ असल्याने सरकारच्या तिजोरीत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा जमा होईल असे दूरदूरपर्यंत दिसत नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले मोठे नीच आणि चतुर असतात.”
 
 
“या राज्यात थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मराठी माणसाने बघावे ते राज ठाकरे एकतर मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर खूप वर्षांनी पूर्वीच्या जोशात, जोमात लोकसभा निवडणूक प्रचारात दिसले. नेमका त्यांचा आवाज लगेचच काही महिन्यांत दिसेनासा होणे, मनापासून वाईट वाटते. असे घडायला नको होते. राज यांच्यापुढे काळ्या व्यवहारात कितीतरी पुढे असलेले या राज्यातले अनेक, पण संकट केवळ राज यांच्यावर ओढवले तेही वाईट वाटले. पीएमएलए हा कायदाच काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना रोखणारा आहे. त्यात किमान तीन वर्षे जामीनदेखील मिळत नाही. त्यामुळेच या राज्यातले, या देशातले आजपर्यंत काळा पैसा पांढरा करणारे शासकीय, प्रशासकीय अधिकारी, नेते, शासकीय दलाल आणि कंत्राटदार धास्तावलेले आहेत. अर्थात कोणीतरी हा कायदा राबविण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले होते. ते मोदी सरकारने केले. आज त्या-त्या नेत्यांच्या फॉलोअर्सना वाईट वाटते. पण, हे घडणे अत्यावश्यक होते. एकदाचे घडायला लागले.”
 
 

 
 
 
“ईडी ही देशातील सर्वाधिक शक्तिशाली तपासयंत्रणा. त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडणे म्हणजे जवळपास रस्त्यावर येणे असे आहे. ईडी तपासाची मोठी किंमत कशी मोजावी लागते ते भुजबळ कुटुंबाबाबतीत आपण यापूर्वी बघितले आहेच. प्रश्न एकच मनाला पडतो की, टप्प्याटप्प्याने नवश्रीमंत यात अडकतील की आश्रयाला गेले असल्याने सुटतील. ते एक गूढ आहे. मात्र, असे घडले आणि राज्यातले भामटे जर आश्रयाला गेल्याने सुटले तर विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. लोकांच्या मनातून ते उतरतील. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ईडीला अमुक एखाद्याला अटक करण्याचे थेट अधिकार आहेत. जेथे जामीन देण्यासाठी प्रसंगी न्यायालयेदेखील कचरतात. केवळ राज ठाकरे किंवा उन्मेष जोशी यांची ईडीने जरी चौकशी केलेली असली तरी आणखी काही मंडळींची त्यात पुढे चौकशी होणार असल्याची माझी माहिती आहे, ज्याची संबंधितांना कल्पना आलेली असल्याने अनेक चौकशीच्या धाकाने धास्तावलेले आहेत.”

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content