HomeArchiveराजापूरच्या पुरातन वखारीचे...

राजापूरच्या पुरातन वखारीचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा! पालकमंत्री रविंद्र वायकर यांची मागणी

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या सौदर्यांत अधिक भर घालण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ब्रिटीशकालीन वखारीची पुर्नबांधणी करून तिचे पुरातन वस्तुसंग्रहालय व आर्ट गॅलरीमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी विनंती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राजापूर येथे इ.स.१६४९ साली वखार बांधली. ही वखार १७०८ सालापासून बंद करण्यात आली आहे. या वखारीला ऐतिहासिक वारसा असल्याने राजापूर तालुक्याच्या विविध वैभवांपैकी एक, अशी तिची गणना करण्यात येते. असे असतानाही सद्य:स्थितीत ही वखार अतिशय जीर्ण झाली असून बंद स्थितीत आहे. ही वखार गृह खात्याच्या ताब्यात असून त्याचा पुनर्विकास करून त्याला गतवैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे. या वखारीची ऐतिहासिक ओळख कायम ठेवून याचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. याचा पुनर्विकास करताना पुरातन वास्तूचे बाह्यरुप, पदचिन्ह, रंगकामाचा दर्जा, इ. इस्ट इंडिया कंपनीने वखार बांधली, त्यानुसारच त्याचा पुनर्विकास केला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्याची ओळख ही पर्यटन जिल्हा म्हणून असल्याने राजापुर येथील वखारीचा पुनर्विकास करताना त्या ठिकाणी पुरातन वस्तुसंग्रहालय, अद्यावत कलादालन इत्यादी निर्माण करण्याची गरज आहे, असे वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास मदत तर होईलच, त्याचबरोबर राजापूरबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होईल, असे मत वायकर यांनी व्यक्त केले.

राजापूर येथे वेळोवेळी केलेल्या दौर्‍यात स्थानिक जनतेनेही याबाबत माझ्याकडे मागणी केली आहे. ही वखार गृह खात्याच्या अखत्यारित असल्याने, गृह खात्याचे प्रमुख या नात्याने या वास्तूचा पुनर्विकास करण्यासाठी पर्याप्त निधीची २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही पालकमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content