HomeArchiveयुनियन बँकेच्या लीलावास...

युनियन बँकेच्या लीलावास उत्तम प्रतिसाद

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
युनियन बँक ऑफ इंडियाने एकत्रfकरणानंतर बँकिंग क्षेत्रात सकारात्मक पावले उचलली आहेत. पहिल्या तिमाहीत ३३३ कोटी रु.चा नफा नोंदवून या बँकेने आता NPA व्यवस्थापनासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत.
 
“लॉकडाTन असूनही नॉन-परफॉर्मिंग झालेल्या खात्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या लिलावाचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. दिनांक ०१. ०४. २०२० रोजी एकत्रfकरण झाल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा आकार आता वाढला आहे. या बँकेने तटस्थ आणि पारदर्शक पद्धतीने जाहीर ई-लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून स्पर्धात्मक दारांनी वाणिज्यिक जागा, फ्लॅट, स्वतंत्र घरे, रिकामे प्लॉट, औद्योगिक युनिट्स यासारख्या स्थावर मालमत्तेचा मासिक मेगा ई-लिलाव योजण्यात यश मिळवले आहे.”
  

 
“२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात बँकेने त्यांच्याकडे असलेल्या सिक्योर्ड मालमत्तेच्या, विशेषतः स्थावर मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया जुलै २०२०पासून वित्तीय मालमत्तांचे सिक्युरिटीकरण आणि पुनर्निर्माण आणि सुरक्षा व्याज अंमलबजावणी कायदा २००२ अंतर्गत यशस्वीरित्या सुरू केली आहे आणि दर महिन्याला मेगा ई-लिलाव करण्याची प्रथा चालू ठेवली आहे. बँकेने या आर्थिक वर्षात चार मेगा ई-लिलाव योजले आहेत आणि प्रत्येक लिलावात यशस्वी बीडर्सना अनेक मालमत्ता विकल्या आहेत. लिलावातील संतुष्ट खरेदीदारांची संख्या ३०५वर पोहोचली आहे.”
 
“दर महिन्याला अधिक व्यवस्थित पद्धतीने आणि सुनियोजित स्वरूपात मेगा ई-लिलाव करण्याचा आणि ऑनलाइन ई-लिलाव योजण्याचा युनियन बँकेचा मानस आहे, जेणे करून संभावित खरेदीदारांना मेगा ई-लिलावाच्या माध्यमातून मालमत्तांचा अधिक चांगला सौदा करता येऊ शकेल. ऑनलाइन ई-लिलाव मंच बीडर्सना घर / इतर मालमत्तेचा शोध घेताना सर्व लाभ, सोय-सुविधा आणि बिडिंग प्रक्रियेत सहभागी होण्याची सुकरता प्रदान करतो. त्यांचा वेळ वाचवतो आणि बिडिंग प्रक्रिया पारदर्शक असल्याची खातरजमा करतो.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content