HomeArchiveयशस्वी ट्रेडिंगसाठी या...

यशस्वी ट्रेडिंगसाठी या गोष्टींकडे असावे लक्ष

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
इतर अनेक कौशल्यांप्रमाणेच यशस्वी ट्रेडिंगची कला ही सराव आणि सतत दक्ष राहून शिकता येते. तसेच अधिक चांगली करता येते. ट्रेडिंगमध्ये जादूच्या कांडीसारखे परिणाम दिसावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. साहजिकच यामुळे त्यांच्या पदरी मोठी निराशा येते. या खेळाचे काही मूलभूत नियम पाळल्यास कुणीही नवशिका या व्यवसायात उत्तम कामगिरी बजावू शकतो आणि नफ्याचा आलेख उंचावू शकतो.
 
याबद्दल अधिक माहिती देत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हजचे मुख्य विश्लेषक समीत चव्हाण.
 
१. डेटावर विश्वास ठेवा:
 
“मार्केट जाणून घेणे आणि ते कसा आकार घेते, याविषयी माहिती ठेवण्यावर हा व्यवसाय अवलंबून असतो. अधिक चतुराईने गुंतवणूक करण्यासाठी मार्केटचे मूलभूत कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. एक ट्रेडर या नात्याने आपल्याकडे पुरसे ट्रेडिंग कॉल्स, पुरेसा डेटा आणि योग्य संशोधन असणे गरजेचे आहे. या कामासाठी ज्यांच्याकडे समर्पित विश्लेषक असतात, अशा पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या ब्रोकिंग कंपन्यांकडून मार्गदर्शन मिळवता येईल. तंत्रज्ञानप्रणित रोबो सल्लागारांचा उदय झाल्यानंतर आज आपण या क्षेत्रातील एक मोठा बदलही अनुभवत आहोत. या उद्योगातील अग्रणी एकाच वेळेला एक अब्ज डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करतात. त्यामुळे गुंतवणूक करताना एखाद्या रोबो अॅडव्हायजरीतही नोंदणी करण्यावर विचार करायला हवा.”
 
२. तुमचे ‘भविष्य’ आणि ‘पर्याय’ माहित करून घ्या:
 
“व्यापारात प्रवेश करताना मार्केटविषयी शक्य तेवढ्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उपलब्ध असलेले सर्व पर्याय तुम्हाला माहिती हवेत. ट्रेडिंग म्हणजे मार्केटमधील किंमतींना खरेदी आणि विक्री करणे एवढेच आहे असा तुमचा विचार असेल तर यात अजूनही बरेच पैलू असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. मार्जिन ट्रेडिंगद्वारे न परवडणारे अधिक समभागही विकत घेता येतात. यालाच आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. तथापि, डेरिव्हेटिव्हजचा विचार केला जातो तेव्हा यात उडी घेण्यापूर्वी याचे फायदे-तोटे समजून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या जोखीमीही अचानक वाढतात.”

 
 
३. खबरदारीने जोखीम पत्कराः
 
“या संदर्भात एक वाक्य अगदी स्पष्ट आहे. तुम्ही जे गमावू शकता, त्याचाच व्यापार करा. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही पैसे गमावणारच. भविष्यातील बचत किंवा इतर कोणत्या कर्तव्यासाठी ठेवलेल्या पैशांतून ही रक्कम घेतली नसेल तर ठराविक आवश्यक जोखीम पत्करण्यास तुम्ही सक्षम आहात. तसेच ट्रेडर्सनी विशेषत: डे ट्रेडिंगमध्ये अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या थरारास बळी पडू नये. तुम्ही सर्व ट्रेडसमध्ये पराभूत होत असाल, जे की या व्यवसायातील सत्य आहे. तरीही आपले किमान भांडवल वाचवण्याचा आणि ट्रेडिंग सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतच राहिले पाहिजे.”
 
४. शिस्त राखा आणि स्टॉप लॉसचा वापर कराः
 
“एखादी व्यक्ती गुंतवणुकीत प्रगती करू लागते आणि तिचे यातील अंतर्ज्ञान वाढीस लागते. तेव्हा एक क्षण असाही येतो, जेव्हा पैसा कमावण्यासाठी ट्रेडिंग आणि आपले अंदाज योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी ट्रेडिंग यातल्या सीमा धुसर होतात. ट्रेडर्सना ट्रेडिंगमार्फत फक्त आपले ज्ञान पडताळून पाहायचे असते. तेव्हा त्यांच्या गुंतवणुकीच्या करिअरची उतरती कळा सुरू झाली, असे समजावे. यासंदर्भाने ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉसचा वापर करणे शिस्तशीर ठरते. ही समर्थन पातळीच्या अगदी खालची ट्रेडिंगची किंमत असते (या मूल्यापासून स्टॉक त्याच्या स्तरावरून घसरतो). एखाद्या शेअरचे मूल्य ‘स्टॉप लॉस’च्या मर्यादेपर्यंत पोहोचले तर ते सर्व शेअर्स विकले जातील. जेणेकरून आपल्याला जास्त नुकसान होणार नाही.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content