HomeArchiveमोदी आणि मंडेला

मोदी आणि मंडेला

Details
मोदी आणि मंडेला

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा संपत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सततच्या टीकेने संतप्त झालेले मोदी जाहीर सभेत राहुल यांना उद्देशून म्हणाले की, `तुमच्या वडिलांना त्यांच्याच लोकांनी मिस्टर क्लीन म्हणून प्रसिद्ध केले. पण मरताना ते भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून गेले’. वास्तविक आपल्या संस्कृतीत गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलले जात नाही. त्यात देशाच्या पंतप्रधानांकडून इतक्या खालच्या थराची टीका तर बिल्कूल अपेक्षित नाही. पण मोदी पातळी सोडून बोलले. पुन्हा हे बोलताना त्यांनी राजीव गांधी यांच्यावर घोर अन्याय केला. ज्या भ्रष्टाचाराचा उल्लेख मोदी यांनी केला होता, त्या बोफोर्सच्या तथाकथित भ्रष्टाचारातून कोर्टाने राजीवजींना कधीच `क्लीन चीट’ दिली होती. शिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपनेदेखील राजीवजी निर्दोष असल्याचे मान्य केले होते. म्हणूनच या `क्लीन चीट’ला आव्हान न देण्याचा निर्णय भाजपने तेव्हा घेतला होता. आज त्याच विषयावर मोदी यांनी अशाप्रकारे दिवंगत पंतप्रधानांवर टीका करणे हे निषेधार्ह आहे.

राज्यकर्त्याने द्वेषाचे अथवा सूडाचे राजकारण करायचे नसते. ते त्याला शोभत नाही. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच महात्मा गांधींचा आदर्श नेल्सन मंडेला यांनी समोर ठेवीत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या लाखो बांधवांना उत्कर्षाची नवी दिशा दाखविली. या पार्श्वभूमीवर मंडेला यांनी एके ठिकाणी लिहिलेले त्यांचे विचार नमूद करीत आहोत :
मंडेला म्हणतात…

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळच्या असलेल्या माझ्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सर्वांसाठी जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एका इसमाकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो जेवणाची वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला. त्याने लगेच खायला सुरूवात केली. जेवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते. तरीही त्याने पटापट जेवण केले आणि आमचे जेवण संपायच्या आत तो तिथून निघून गेला.

तो गेल्यानंतर माझा सहकारी मला म्हणाला, `तुम्ही पाहिलंत का त्याला? तो बराच आजारी वाटत होता. त्याच्या हातापायात मुळीच त्राण नव्हते. जेवताना त्याचे हात सतत थरथरत होते!’

मी म्हणालो, `नाही. ते तसे नाही. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात होतो, तेव्हा मला ज्या बराकीत ठेवले होते तिथे हा सुरक्षारक्षक होता. माझा छळ करणे ही त्याच्यासाठी नित्याचीच बाब होती. मी काकुळतीला येऊन जेव्हा पाणी मागायचो तेव्हा हा यायचा आणि कुत्सितपणे हसत माझ्या तोंडावर लघवी करून जायचा. आता राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मीही त्याला बोलावून त्याच्याबरोबर तसाच व्यवहार करतो की काय? या भीतीने तो थरथर कापत होता!! मला सूड उगविण्याची संधी होती. पण ते माझ्या नैतिकतेत बसत नाही. सूड आणि द्वेषाची भावना राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाते तर सहनशीलता राष्ट्र उभारणीला पोषक ठरते!! सारांश, मंडेला आणि मोदी या दोन नेत्यांमध्ये दोन भिन्न विचारप्रवाह दिसतात. मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेत राहून महात्मा गांधींना स्वीकारले तर नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये जन्माला येऊनदेखील महात्मा गांधींना ओळखू शकले नाहीत. त्यांना पचवू शकले नाहीत. मोदीजींकडून पुन्हा अशी चूक होऊ नये, हीच अपेक्षा!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content