HomeArchiveमुंबईच्या तोंडचे `पाणी'...

मुंबईच्या तोंडचे `पाणी’ पळाले!

Details
मुंबईच्या तोंडचे `पाणी’ पळाले!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवन आझाद मैदान येथे आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही वास्तू तेथे दिमाखात उभी आहे. काही वर्षांपूर्वी या वास्तूच्या आवारात बोअरवेल खोदण्यात आली. सुदैवाने अवघ्या 20 फुटांवर पाणी लागले. महापालिकेने ते पाणी तपासले. ते उत्तम प्रतीचे असल्याचे प्रमाणपत्रदेखील दिले. पण शेजारी मेट्रोसाठी खोदकाम सुरू झाले आणि बोअरवेल हळूहळू कोरडी ठणठणीत पडली. रोज शेकडो लीटर पाणी देणारी ही बोअरवेल आता पार सुकून गेली आहे. मेट्रोच्या खोदकामाने तिचे पाणी शोषून घेतले. मुंबईतील इतर ठिकाणी चौकशी केली असता धक्कादायक माहिती हाती आली. जेथे जेथे मेट्रोचे खोदकाम सुरू झाले, तेथे तेथे बोअरवेलचे पाणी आटले. सारांश, मेट्रोने मुंबईच्या तोंडचे पाणी पळविले.

मुंबईचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात आम्ही एक उपयुक्त पोस्ट वाचली. कोकणातील विहिरी, कूपनलिका व तलाव कसे साफ ठेवता येतील? याचे विवेचन या पोस्टमध्ये आढळले. गावचे गावपण टिकले की स्वच्छता राहते, प्रदूषण होत नाही. महत्त्वाचे म्हणजे पाणी मुबलक शिल्लक राहते. अजूनही आपले पाणी खूप चांगले आहे. पाणी शुद्ध करण्याची मशीन बाजारात आल्यापासून आपले पाणी कसे क्षारयुक्त आहे व त्यामुळे मूतखडा होतो अशी भीती दाखवून आपल्याला मशीन घेण्यास किंवा तथाकथित शुद्ध पाणी विकत घेण्यास भाग पाडले जाते. खरे म्हणजे आपले पाणी नैसर्गिक शुद्ध आहे. ते विहिरी साफ ठेवून तसेच शुद्ध ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली भातशेती ही पृथ्वीवरील कोट्यवधी तलावेच आहेत. कारण त्या भातशेतात चार ते पाच महिने पाणी मुरत असते. तेव्हा भातशेती करणे अधिक हितकारक आहे. भातशेतीमुळे पाणी मुरेल, शुद्ध अन्न, शारीरिक कष्ट व शांत झोपेमुळे आरोग्यदेखील चांगले राहील. यापूर्वीच्या आपल्या पूर्वजांचे आरोग्य जसे ठणठणीत होते, तसेच आरोग्य आपल्या वाट्याला येईल.

आज राज्यातील बहुतेक धरणे कोरडी पडली आहेत. तसेच तेथील शेतातील भूजल पातळीदेखील खोल गेली आहे. कारण नदीचे पाणी थांबवून ठेवल्यामुळे पुढील पात्रात पाणी वाहत नाही. जर पाणी वाहिलेच नाही, तर ते जमिनीत मुरणार कसे? महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक धरणे असूनदेखील पाणी समस्या वाढतच आहे. जेव्हा धरणे नव्हती तेव्हा पाणी समस्यादेखील मोठी नव्हती, हा योगायोग नव्हे! आजकाल जो तो विकासाच्या नावाने बोलतो आहे. पण विकास म्हणजे नक्की काय, हे राज्यकर्त्यांशिवाय कोणालाच ठाऊक नाही. विकास म्हणजे अब्जावधी रूपये खर्च करणे. पूल, रस्ते, समुद्रातील पूल, धरणे आदी बांधणे. त्यातून अब्जावधी रूपये कमविणे. शिवाय निसर्गावर अत्याचार करणे. अजूनही वेळ गेलेली नाही. आज मुंबईच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उद्या राज्याच्या आणि देशाच्या तोंडचे पाणी पळू शकते. निसर्गाकडे मानवाला देण्यासारखे खूप काही आहे. पण मानवाची भूक मोठी आहे. त्यातूनच राक्षसी विकास सुरू आहे. हा `राक्षस’ एक दिवस आपले वाटोळे करेल. त्याआधीच त्याला रोखले पाहिजे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content