HomeArchiveमुंबईकरांना सुरक्षित, सुखद...

मुंबईकरांना सुरक्षित, सुखद प्रवासाचा आनंद मिळणार – मनोज कोटक

Details
“मुंबईकरांना सुरक्षित, सुखद प्रवासाचा आनंद मिळणार – मनोज कोटक”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उपनगरीय लोकल सेवा अधिक सक्षम करून मुंबईकर रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुखद आणि आरामदायी प्रवासाचा आनंद देणे, यालाच आपल्या सरकारचे सर्वाधिक प्राधान्य असून येत्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेचा चेहरामोहराच बदलेल, असा विश्वास ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यात कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान प्रवाशांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुंबई उपनगरीय लोकलसाठी एकूण ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापैकी सुरूवातीच्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प म्हणजेच एमयूटीपी- ३अ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली. गेल्या पन्नास वर्षांतील मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. या निधीतून रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांची दर्जोन्नती करण्यात येणार असून पादचारी पूल सुशोभिकरण, सर्व उपनगरीय रेल्वेस्थानकांवर सरकते जिने व लिफ्ट तसेच मुंबईच्या ३२ स्थानकांमध्ये एकात्मिक सुरक्षा प्रणाली सुरू करण्यासाठी वीस कोटी रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले

बऱ्याच कालावधीनंतर या देशाला एक पियुष गोयल यांच्या रूपाने एक मुंबईकर रेल्वेमंत्री लाभल्यामुळे काँग्रेसच्या काळात दुर्लक्षित असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचा जास्तीतजास्त विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून मीसुद्धा प्रचारादरम्यान माझ्या मतदारसंघात असलेल्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी देत आहे. या भेटींदरम्यान रेल्वे प्रवाशांशी होत असलेल्या चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले आहेत. रेल्वे प्रवाशांकडून आलेल्या या सूचनांचा मी पुढील काळात पाठपुरावा करणार असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी हा माझा प्रयत्न असेल, असेही कोटक यांनी सांगितले.

होर्डिंग्जचे विद्रुपीकरण

दरम्यान, भाजपाविरोधी काही तत्त्वांनी शिवाजी नगर, गोवंडी परिसरात उभ्या असलेल्या भाजपाच्या एलईडी रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तसेच निशाणीचे विद्रुपीकरण केले. कोटक यांच्या प्रचारासाठी हा रथ वापरला जात होता. भाजपाने याबद्दल शिवाजीनगर पोलीसठाण्यात तक्रार केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content