HomeArchiveमिलाग्रोने आणले ४...

मिलाग्रोने आणले ४ ह्युमनॉइड रोबोट्स!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
कोरोनाचा देशभरात कहर सुरू असल्याने स्वयंचललित उपायांची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता, भारतातील प्रथम क्रमांकाच्या कंझ्युमर रोबोटक्स ब्रँड, मिलाग्रो रोबोट्सने ४ नवे ह्युमनॉइड रोबोट्स बाजारात आणले आहेत. रोबोदिकॅप्रिओ, रोबोज्युलिया, रोबोनॅनो आणि रोबोएल्फ हे विशेषत: हॉटेल्स, हॉस्पिटल्स, रेस्टॉर्ंट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसच्या समस्यांवरील उपायांसाठी तयार करण्यात आले आहेत.
 
रोबोदिकॅप्रिओः हा गेस्ट रिलेशन्स रोबोट १५५ सेंटीमीटर उंच असून हॉटेल, बँक, प्रशासकीय केंद्र, संग्रहालये, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉल्स इत्यादी ठिकाणी व्यवसाय सल्ला, अभिवादन करणे, आरक्षण, जाहिरात, गस्त आदी कामांसाठी वापरला जाऊ शकतो. मानवी अस्तित्त्वाची जाणीव करून देण्यासाठी रोबोदिकॅप्रिओमध्ये अत्याधुनिक सेंसर्स आहेत. यामुळे तो व्हिजिटर्सशी सक्रियतेने संवाद साधू शकतो. रोबोट त्यांच्याशी बोलताना अभिवादन करू शकतो, जाहिरातविषयक माहिती प्रसारीत करण्यासह, विविध ठिकाणच्या व्हिजिटर्सना मार्गदर्शन करू शकतो.
 

 
 
रोबोज्युलियाः हा १५५ सेंटीमीटर उंचीचा सेवा करणारा रोबोट आहे. यात एलआयडीएआर आणि मिलाग्रोची रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी यासारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन टेक्नोलॉजी आणि सेंसर्स आहेत. पाहुण्यांच्या नियोजित टेबलांवर जेवण पोहोचवणे, मेन्यू समजवून सांगणे, रेस्टॉरंटची माहिती देणे इत्यादी कामांसाठी याची रचना करण्यात आली आहे. रोबोज्युलिया रोबोटला अँटी स्किड रबर व्हिल्स असून तो ३ किमी प्रति तास चालू शकतो.
 
रोबोएल्फः हा एम्स, नवी दिल्ली आणि सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथे आधीच तैनात आहे. हा शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स, बँका, महानगरे, प्राथमिक शाळा आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. रोबोटच्या नव्या आवृत्तीत एक व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (विशेषत: कमर्शिअल चेन स्टोअर्स) आणि मल्टी सर्व्हिस प्लॅटफॉर्म सिस्टिम देण्यात आली आहे. याची सर्व्हिस सिस्टिम क्लाऊड टर्मिनलवर आधारीत असल्याने यूझर त्याला जगात कोठूनही ऑर्डर देऊ शकतात आणि नव्या फाईल्स प्रोसेस करू शकतात. हा रोबोट इतर रोबोटकडून डेटा कलेक्ट करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात सक्षम आहे. यामुळे व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो.
 

 
 
रोबोनॅनोः एक पर्सनल असिस्टंट रोबोट असून त्यात अॅमेझॉनची अॅलेक्सा सर्व्हिस आहे. यातील इंटेलिजंट, क्लाऊड आधारित रोबोट फीचर व्हॉइस असिस्टन्स, स्मार्ट होम कंट्रोल आणि रिमोट सर्व्हिलान्स क्षमता, सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट आणि घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. रोबोनॅनो ८५ मीटर लांब असून यात ५० प्रकारचे सेंसर्स आहेत, जेणेकरून तो आवाज ओळखू शकतो, रस्त्यात येणाऱ्या वस्तूंपासून बचाव करू शकतो, कुणी खोलीत प्रवेश केला तर त्याला कळू शकते. यासह हा ह्युमनॉइड पिझ्झा ऑर्डर करणे, कार बुक करणे, फिटनेस स्टेट्स ट्रॅक करणे, टीव्ही कंट्रोल करणे आणि अग्रगण्य स्ट्रीमिंग सर्व्हिसेसमध्ये गाणी लावण्यास सक्षम आहे. जगात कोठूनही हा रोबोट नियंत्रित केला जाऊ शकतो. घरातील सदस्य नसताना हा रोबोट घराची मॉनिटरींग करतो. शंका निर्माण करणारी घटना घडल्यास अलार्म अॅक्टिव्ह करण्यातही तो समर्थ आहे.
 
मिलाग्रो ह्युमनटेकचे अध्यक्ष-संस्थापक राजीव करवाल म्हणाले की, मिलाग्रो आपल्या उद्दिष्टाप्रती वचनबद्ध आहे. आज आमच्याकडे २० प्रकारचे रोबोट्स असून ते आपापली भूमिका पार पाडण्यात समर्थ असून भारताला आत्मनिर्भर बनवत आहेत. आमचे रोबोट विविध उद्योगांमधील क्षमता आणि उत्पादकता वाढवण्यास समर्थ आहेत. या खास ऑफरिंगसह आम्ही भविष्यातदेखील नव्या प्रकारचे कार्य करत राहू.
 “

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content