HomeArchive'मित्रों'वर एका महिन्यात...

‘मित्रों’वर एका महिन्यात ९ अब्ज व्हिडीओ!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर एक महिन्यातच मित्रों, या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅपने त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळवली. जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गूगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
 
एप्रिल २०२०मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों, हे अॅप सुरूवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाईन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
 
मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले की, ‘यूझर्सना विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहणे आणि अपलोड करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म प्रदान करणे ही संकल्पना अॅप विकसित करण्यामागे होती. अगदी थोड्या कालावधीत मित्रोंने मिळवलेली लोकप्रियता पाहून आम्ही थक्क झालो आहोत. मित्रों प्लॅटफॉर्मवर लाखो नवे व्हिडिओ तयार होणे, हे अविश्वसनीय आहे. या अॅपवर दैनंदिन मनोरंजनाचा डोस घेणाऱ्या आमच्या सर्व अॅप यूझर्सना आम्ही धन्यवाद देतो.’
 

 
देशातील करनाल, हुबळी, भावनगर, अलिगड, लुधियाना आणि विजयवाडा यासारख्या लहान शहर आणि गावांतून आम्हाला तगडा प्रतिसाद मिळतोय. येथून १००,००० पेक्षा जास्त यूझर्स मिळाले आहेत, असे शिवांक पुढे म्हणाले.
 
सह-संस्थापक आणि सीटीओ अनिश खंडेलवाल म्हणाले की, ‘आमच्या यूझर्सची वाढ खूप उत्साहवर्धक आहे. यूझर्सची व्यग्रता वाढवणे व त्यांनी अॅपवर टिकून राहण्यासाठी आम्ही लक्षपूर्वक प्रयत्न करत आहोत. जवळपास प्रत्येक यूझर दररोज ८० व्हिडिओ पाहतो. तसेच अनेक नव्या उत्पादन सुविधांद्वारे आम्ही आणखी एंगेजमेंट वाढवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.’
 
मित्रों विकसकांसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे अॅप यूझर्सना व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपे आणि अखंड इंटरफेस प्रदान करते. त्याचवेळेला प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची लायब्ररीदेखील उपलब्ध करून देते.
 “

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content