HomeArchiveमागाठाणेत ५० रूपयांत...

मागाठाणेत ५० रूपयांत होणार डायलिसिस

Details
मागाठाणेत ५० रूपयांत होणार डायलिसिस

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईच्या मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याप्रमाणे शिवसेनेच्या सर्व आमदार व कार्यकर्त्यांची बांधिलकी जनतेशी असून शिवसेना खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांसाठी झटत असते, असे गौरवोद्गार युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच दहिसर येथे काढले.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी वनखात्याच्या जमिनीवरील पुनर्वसनाचा प्रश्न मांडला, त्याचा धागा पकडून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे ठोस आश्वासनदेखील त्यांनी दिले. यावेळी त्यांनी आमदार सुर्वे यांच्या कार्याचा गौरव करून आगामी विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा जोरदार बाजी मारतील, असा विश्वासही व्यक्त केला.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील गरजू नागरिकांना ५० रूपये नाममात्र दरात ४० बेडच्या सुसज्ज डायलिसिस सेंटरची सुविधा तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुर्वे व डॉ. शिवराज पटारिया यांनी उपलब्ध करून दिली आहे. दहिसर पूर्व आनंद नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मनन इमारतीलगत सुसज्ज डायलिसिस सेंटर उघडण्यात आले आहे.
 

 
 
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. त्यानंतर ठाकरे यांची जाहीर सभाही झाली. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत ५६ विधानसभा मतदारसंघांना आपण भेटी दिल्या असल्याचे सांगून बेरोजगार व प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी मागाठाणेतील जनतेचाही आशिर्वाद मागितला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार प्रकाश सुर्वे यांनी गेल्या ५८ महिन्यांत आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन पुढील विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडला. मागाठाणे विधानसभेतील ४०० रूग्णांवर १० कोटी रूपयांचे उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या २८ जून ते २ जुलै दरम्यान येथील २३८० ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशी विश्वनाथ दर्शन घडवले, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार विलास पोतनीस, सचिन अहिर, आमदार मनीषा चौधरी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधि समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, व प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, डॉ. शिवराज पटारिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
 

 
 

 ”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“मुंबईच्या मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याप्रमाणे शिवसेनेच्या सर्व आमदार व कार्यकर्त्यांची बांधिलकी जनतेशी असून शिवसेना खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांसाठी झटत असते, असे गौरवोद्गार युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच दहिसर येथे काढले.”

“आमदार प्रकाश सुर्वे यांनी वनखात्याच्या जमिनीवरील पुनर्वसनाचा प्रश्न मांडला, त्याचा धागा पकडून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे ठोस आश्वासनदेखील त्यांनी दिले. यावेळी त्यांनी आमदार सुर्वे यांच्या कार्याचा गौरव करून आगामी विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा जोरदार बाजी मारतील, असा विश्वासही व्यक्त केला.”

“मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील गरजू नागरिकांना ५० रूपये नाममात्र दरात ४० बेडच्या सुसज्ज डायलिसिस सेंटरची सुविधा तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन व शिवम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुर्वे व डॉ. शिवराज पटारिया यांनी उपलब्ध करून दिली आहे. दहिसर पूर्व आनंद नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मनन इमारतीलगत सुसज्ज डायलिसिस सेंटर उघडण्यात आले आहे.”
 

 
 

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. त्यानंतर ठाकरे यांची जाहीर सभाही झाली. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत ५६ विधानसभा मतदारसंघांना आपण भेटी दिल्या असल्याचे सांगून बेरोजगार व प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी मागाठाणेतील जनतेचाही आशिर्वाद मागितला.

“आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार प्रकाश सुर्वे यांनी गेल्या ५८ महिन्यांत आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन पुढील विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडला. मागाठाणे विधानसभेतील ४०० रूग्णांवर १० कोटी रूपयांचे उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या २८ जून ते २ जुलै दरम्यान येथील २३८० ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशी विश्वनाथ दर्शन घडवले, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार विलास पोतनीस, सचिन अहिर, आमदार मनीषा चौधरी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधि समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, व प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, डॉ. शिवराज पटारिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.”
 
 

 
 

 

Continue reading

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...
Skip to content