HomeArchiveमहेश काळेंची अशीही...

महेश काळेंची अशीही `मैफल’

Details
महेश काळेंची अशीही `मैफल’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
महेश काळे हे नाव म्हणजे शास्त्रीय संगीतातील अखेरचे टोक आहे. आज महेश यांचे चाहते जगभर पसरले आहेत. ते स्वत: उत्तम गातात आणि इतरांना गाणे शिकवितात. गाणे हा त्यांचा जीव की प्राण आहे. महेश काळे यांचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम जगभर होत असतात. ते चांगलेच रंगतात. त्यांचे चाहते महेशला डोक्यावर घेतात. अशा रंगणाऱ्या मैफलींची महेश यांना सवय आहे. पण गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात महेश काळे यांची वेगळीच `मैफल′ रंगली. ती मैफल होती वार्तालापाची. महेश काळे यांना गाताना आपण नेहमीच पाहतो. पण ते जे गातात त्या गाण्याबद्दल, शास्त्रीय संगीताबद्दल, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल, उदयोन्मुख कलाकारांबद्दल त्यांना काय वाटते? त्यांच्याशी रंगलेल्या वार्तालापात हे ऐकायला मिळाले.

ते म्हणाले, `भारतीय संगीत हे चोवीस कॅरेट सोने आहे. त्याला थोडी झळाळी दिली तर हे संगीत तरुणांपर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचेल.’ उदयोन्मुख गायकांना संदेश देताना हा महान कलाकार म्हणाला की, `स्वप्न बघा व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. गाण्याचा व आयुष्याचा जवळचा संबंध आहे. सात्विक आनंद शोधण्याची संगीत ही एक कला आहे.’ मोजक्या शब्दात महेश काळे संगीताबद्दल खूप काही बोलून गेले.

महेश काळे हे मूळचे पुण्याचे. म्हणजे ते पक्के पुणेकरच. वडील महाराष्ट्र बँकेत नोकरीला होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपल्या बाबांसोबत गोंदवल्यात छोट्या महेशने पाच हजार लोकांसमोर अभंग सादर करून पहिली दाद मिळविली. आजही त्यांना तो प्रसंग प्रकर्षाने आठवतो. महेश यांची पहिली गुरू म्हणजे त्यांची आई. आरंभीचे गायनाचे प्राथमिक धडे पुरूषोत्तम गांगुर्डे यांच्याकडे घेतल्यावर 1991 ला त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गुरूकूल पद्धतीने सहा-सात वर्षे गायनाचे शास्त्रीय ज्ञान घेतले. अभिषेकी बुवांकडे पारंपरिक शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि नाट्य संगीताचे शिक्षण महेशने घोटून घेतले. आजही महेश यांच्या गळ्यावर अभिषेकी बुवांची छाप आढळते. बुवांनी संगीत गावोगावी पेरले. शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी ते जिथे बोलाविणे येईल तिथे जायचे. तेथे बिदागी किती मिळेल, व्यवस्था कशी असेल याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. आज त्यांचे शिष्य महेश काळे हे तेच प्रयत्न करत आहेत. आपले स्फूर्तिस्थान असलेल्या बुवांकडून प्रेरणा घेऊन ते गाणे शिकत आहेत. गाणे शिकविताना ते रुजविण्याचाही प्रयत्न करीत आहेत.

`गीत गाणे आणि संगीत शिकविणे या दोन वेगळ्या कला आहेत. त्या दोन्ही कला महेश यांनी व्यवस्थित आत्मसात केल्या आहेत. गाणे समजावून सांगण्यासाठी आधी ते आत्मसात करावे लागते, ते साठवावे लागते मग ते आठवत समोरचा शिकणारा कसा आहे, त्याच्या कुवतीनुसार ते त्याच्यापर्यंत पाझरावे लागते.’ हे आम्ही म्हणत नाही तर दस्तूरखुद्द महेश काळे यांचे हे विचार आहेत. आज महेश अमेरिकेत सुमारे 100-150 विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देतात. यात अनेक वयोगटातील विद्यार्थी आहेत. लहान मुले आहेत, तरूण आहेत तसेच वयोवृद्ध लोकदेखील आहेत. शास्त्रीय संगीत शिकण्याचे नेमके वय कोणते? असे विचारले असता महेश सांगतात, `श्वास असेपर्यंत वयाच्या कितव्याही वर्षी शास्त्रीय संगीत शिकता येते.’

महेश यांनी शास्त्रीय संगीतात मिळविलेले अभूतपूर्व यश कौतुकास्पद आहे. परिश्रम, चिकाटी आणि संगीतावरील श्रद्धा यांच्या बळावरच त्यांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात येऊन त्यांनी वार्तालापरुपी मैफल रंगविली. त्यांचे विचार ऐकून उपस्थितांसह आम्हीदेखील तृप्त झालो.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content