HomeArchiveमहालक्ष्मी वानखेडकर यांच्या...

महालक्ष्मी वानखेडकर यांच्या पेपर आर्टचे राज ठाकरेंकडून कौतुक

Details
महालक्ष्मी वानखेडकर यांच्या पेपर आर्टचे राज ठाकरेंकडून कौतुक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मनोहर कुंभेजकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
अतीसूक्ष्म पेपर कापून त्यामधून हुबेहूब पक्ष्यांची कलाकृती साकार करण्यात कांदिवलीच्या महालक्ष्मी वानखेडकर यांचा नावलौकिक आहे. देशातल्या त्या एकमेव टायनी पेपर आर्टिस्ट आहेत. विविध प्रकारचे पक्षी हुबेहूब तयार करण्यासाठी त्यांना किमान 6 महिने ते दोन वर्षं लागतात. त्यांनी तयार केलेल्या गरूडाच्या प्रतिकृतीला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने गौरवण्यात आले आहे.

त्यांच्या दुर्मिळ कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरले असून ते येत्या 17 जूनपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले आहे. प्रदर्शन बघायला कला रसिकांनी व पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे. या प्रदर्शनात 22 प्रकारचे विविध पक्षी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सुगरण, चिखल खाणारे पक्षी, मकॉव, पेरडाईज, हिमालयातील मेनॉल, टर्की, ग्रे पिकॉक, फ्लेमिंगो, गरूड आणि फुलपाखरांची जन्मावस्था सूक्ष्म पेपर कटिंग आणि पेंटिंग करून त्यांनी हुबेहूब साकारली आहे.

या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व कांदिवली पूर्व विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार व प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी नुकतीच भेट दिली. या प्रदर्शनाचे उदघाटन जहांगीर आर्ट गॅलरीचे अध्यक्ष आदी जहांगीर यांनी केले. या प्रदर्शनाला अभिनेता अरूण नलावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. राज ठाकरे यांनी टायनी पेपर कलेबद्धल महालक्ष्मी वानखेडकर यांचे कौतुक केले आणि त्यांच्याकडून या कलेविषयी माहिती घेतली. या कलेसाठी पेशन्स व हार्डवर्क महत्त्वाचे असून त्यांना शुभेच्छा दिल्या. मी जेजे स्कूलमधून आर्टिस्ट झाले आणि आपण माझ्यापेक्षा सिनियर होता असे वानखेडकर यांनी राज ठाकरे यांना सांगितले.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मी राजकारणी माणूस. माझा तसा कलेशी संबंध नाही. मात्र महालक्ष्मी वानखेडकर यांच्या दुर्मिळ पक्ष्यांचे प्रदर्शन बघून भारावून गेलो. आपण प्रदर्शनाला कसे आलात असे राज ठाकरे यांनी आमदार भातखळकरांना विचारताच, त्या माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले.”
 
“मनोहर कुंभेजकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content