HomeArchiveमहालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यातील...

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यातील सर्व यंत्रणांचे चंद्रकांतदादांनी मानले आभार!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारपासून वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकलेली होती. त्यात तब्बल 1200 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 1200 प्रवासी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. या अडकलेल्या सर्व 1200 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यासाठी राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंटची टीम, एनडीआरएफ, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि एनडीआरएफ टीमप्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते. एनडीआरएफच्या सहा बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून बचाव कार्यात लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलिस प्रशासन, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, हेसुध्दा बचावकार्यात घटनास्थळी हजर होते. त्यानंतर नेव्ही व एअर फोर्सलासुद्धा पाचारण करण्यात आले होते. एअरफोर्स दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सात लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी 117 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एकच्या दरम्यान पाचशे लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वेमध्ये 1200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. याठिकाणी 37 डॉक्टरांची चमूही उपलब्ध करून देण्यात आला होता. ॲम्बुलन्स, औषध उपचार याचीही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. 40 बसेस आणि टेम्पो याच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते असेही पाटील यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content