HomeArchiveमहाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये...

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये आसामचे विद्यार्थी

Details

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलला आसाम येथील भास्कर संस्कार केंद्र, पार्वतीपूरच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. आसामचे एकूण ३० विद्यार्थी, शिक्षक व आयोजक यावेळी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह रणजित सावरकर, प्राचार्य काशिनाथ भोईर, राजेंद्र तिवारी, संदेश गपाट, अशोक वर्णेकर, अलका वर्णेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.”

 
“आसामच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर परेडचे शानदार संचलन महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच चित्तथरारक प्रात्याक्षिकेही सादर करण्यात आली. हे विद्यार्थी आसामच्या सदानी भाषिक समुहाचे होते. चाय जमातीतील मूळ सदानी भाषा जपत तिथली संस्कृती, चालीरिती, सण, उत्सव, पारंपारिक पेहराव तसेच कामगार वर्गाचे कष्टप्रद जीवन ही त्यांची ओळख आहे.”
 
 
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशोक आणि अलका वर्णेकर गेली २५ वर्षे कार्य करत आहेत. त्यांच्यासमवेत पुष्पा मुंडा व संजिता खडीया हे शिक्षकदेखील सहभागी आहेत. या सर्वांनी यावेळी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content