HomeArchiveमनोहर पर्रिकर यांची...

मनोहर पर्रिकर यांची अविस्मरणीय भेट!

Details
मनोहर पर्रिकर यांची अविस्मरणीय भेट!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मी १ एप्रिल २००४ रोजी गोव्याच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात वरिष्ठ सहायक संचालक या पदावर रूजू झालो. त्यावेळी गोवा हे माझे सर्वात आवडते ठिकाण होते. सुशेगाद आणि आदरतिथ्य म्हणजे गोवा, आदरातिथ्य करावे ते गोव्यानेच. पण गेल्या महिन्याभरापासून मला गोवा हे नाव ऐकले की त्रास होतो. तिथे जावे असे आता वाटत नाही. यापुढे मी तिथे जाईन असेही आतातरी वाटतं नाही.

माझे अत्यंत जिवलग मित्र व गोवा विधानसभेचे माजी उपसभापती व प्रसिद्ध कवी विष्णू वाघ यांचे निधन झाल्यानंतर अक्षरशः गोवा हा शब्द कोणी विचारला तर मला फक्त विष्णू आठवायचा. आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्यानंतर तर मी पुन्हा गोव्यात फिरायला तरि जाईन की माहीत नाही. गोव्याच्या या दोन नेत्यांचं माझ्या मनात एक वेगळे स्थान आहे.

मी ज्यावेळी गोव्यात महाराष्ट्र परिचय केंद्रात रूजू झालो, त्यावेळो मी टोंक (करनझालेंम) येथे भाड्याच्या घरात राहत असे. परिचय केंद्र हे गोव्यातील हे एक प्रतिष्ठित कार्यालय. त्यामुळे या कार्यालयाच्या अधिकाऱ्यासही तेवढाच सन्मान मिळत असे. मी तो खूप अनुभवलासुद्धा. २००४ मध्ये गोवा विधानसभेचे सभापती विश्वास सतरकर होते. ते स्वतः चांगले साहित्यरसिक होते. साहजिकच ते माझे चांगले स्नेही झाले.

असाच एक दिवस मी त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला गेलो. ते कार्यालयात जेवण करीत होते. माझा निरोप गेल्यानंतर त्यांनी मला लगेच बोलावले व जेवणाचा आग्रह धरला. दोन घास जेवलो. जेवताजेवता ते मला म्हणाले, तू राहतो कुठे? मी सांगितले की, भाड्याच्या घरात टोंक येथे राहतो. ते लगेच म्हणाले, सरकारी घर का नाही मिळाले? मी म्हणालो, गोवा सरकार इतर राज्यातल्या अधिकाऱ्यांना घर देत नाही. सतरकर लगेच म्हणाले, जेवण झाले की आपण मुख्यमंत्र्यांना (मनोहर पर्रिकर) भेटू.

जेवण झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटायला गेलो. मुख्यमंत्री पर्रिकर यांना भेटणे म्हणजे माझ्यासाठी एक खूपच आनंददायी गोष्ट होती. कारण अत्यंत साधा आणि सरळ असे ते व्यक्तिमत्त्व. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकले होते आणि आज भेट होतेय याचा आनंद होता. सतरकर मला मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. त्यांनी माझा मराठीतून परिचय करून दिला. सतरकर म्हणाले, दयानंद कांबळे हे माझे मित्र आहेत. परिचय केद्राचे ते संचालक आहेत. पण, ते भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांना आपण शासकीय घर दिले पाहिजे.

पर्रिकरांनी ते शांतपणे ऐकले व टेबलावरचा कागद माझ्यासमोर सरकवला व म्हणाले, “शासकीय घर मिळावे असा अर्ज मुख्यमंत्री यांच्या नावे मराठीत लिही.” मी दोन मिनिटांत अर्ज लिहिला व त्यांच्याकडे दिला. माझा अर्ज त्यांनी वाचला व त्यावर क्षणाचाही विलंब न लावता लिहिले,” Sanctioned.” आठ दिवसांत मला शासकीय घर मिळाल्याचे पत्र माझ्या कार्यालयात आले. मला पर्वरी येथे घर देण्यात आले होते, पण मी तिथे राहवयास गेलो नाही कारण मी जिथे राहत होतो, त्याठिकाणी माझी मुलगी शाळेत जात होती. पण, मुख्यमंत्री पर्रिकर यांनी क्षणाचाही विलंब न करता जो निर्णय घेतला होता, त्या निर्णयावरून त्यांची निर्णयक्षमता अफलातून होती, हे कळले. त्यांच्या भेटीचा प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. पर्रिकर साहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली!
दयानंद कांबळे, उपसंचालक”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content