HomeArchiveभारतीय विद्यार्थ्यांसाठी युके...

भारतीय विद्यार्थ्यांसाठी युके एज्युकेशनची दारे खुली!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
ब्रिटनमधील विद्यापीठ राज्यमंत्री मिशेल डोनलॅन एमपी, स्कॉटलँड, वेल्स, नॉदर्न आयर्लंडमधील शिक्षण मंत्री तसेच इंटरनॅशनल ट्रेड डिपार्टमेंटमधील एक्सपोर्ट्स मंत्र्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संबोधून एक खुले पत्र लिहिले आहे.
 
युके अजूनही शिक्षणासाठी स्वागतार्ह ठिकाण असल्याचे सुनिश्चित करण्यात आले असून शिक्षणानंतर व्हिसा परत करण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. या पत्रात व्हिसा, आरोग्य, विद्यापीठातील तयारी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे तसेच जगभरातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची ब्रिटनमधील परंपरा अधोरेखित करण्यात आली असल्याचे स्टडी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इमा लान्सकास्टर यांनी सांगितले.
 

 
 
त्या पुढे म्हणाल्या की, हे व्यावहारिक बदल आणि उपक्रम अभ्यासाकरिता ब्रिटनकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट संबोधित करणारे आहे. विशेषत: पोस्ट स्टडी वर्कमध्ये नुकतेच बदल केले असून ते आंतरराष्ट्रीय पदवीधरांसाठी आता दोन वर्षे लागू होतील. यात कोव्हिड-१९मुळे ऑनलाईन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युके हे अजूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता सर्वोत्कृष्ट ठिकाण असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करण्यात येतील.
 
स्टडी ग्रुपचे युके व युरोपचे व्यवस्थापकीय संचालक आणि एक्सपोर्टिंग एज्युकेशन युकेचे अध्यक्ष जेम्स पिटमॅन यांनी सांगितले की, कोव्हिड-१९च्या समस्येत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सकारात्मकता देण्यासाठी युकेची ही धोरणे महत्त्वाची ठरतील. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासाच्या पर्यायांचा विचार करता, एक मोठा कठीण काळ आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाला युकेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अगदी योग्य असल्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यांना मिळणाऱ्या आधाराद्वारे गुंतवणूक सफल होईल. एकदा ते पदवीधर झाल्यानंतर त्यांना काही काळासाठी लवकरात लवकर करिअरच्या संधी मिळवून देण्यासाठीही योगदान मिळेल.
 “

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content