HomeArchiveभविष्यातील उत्पन्नाचा पर्याय...

भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स भाग-2

Details
भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स भाग-2

    12-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनायक कुळकर्णी ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेश्यक

vvskul@yahoo.com

या  योजनेत गुंतवणुकीचे तीन पर्याय दिले असून त्यातूनच गुंतवणूकदारांना पर्याय निश्चित करावा लागतो. पहिला पर्याय जोखीम युक्त असून त्यात एकूण निधीच्या जास्तीत जास्त ५०% पर्यन्त समभागाशी निगडीत म्हणजेच इंडेक्स फंडात गुंतवणूक केली जाते. हा पर्याय “ई टाईप” महणून गणला जातो. दुसरा पर्याय “जी टाईप” असून त्यात सरकारी रोख्यांमध्येच गुंतवणूक करून जोखीम पूर्णता टाळली जाते. तिसरा पर्याय “सी टाईप” असून त्यातपत जोखीम युक्त कर्जरोखे [Credit Risk- bearing Debt] किंवा निश्चित उत्पन्नावर आधारित गुंतवणूक केलेली असते. याशिवाय या योजनेत कर्तव्यच्युती [Default] पर्याय असून त्यात गुंतवणूकदाराचे वय लक्षात घेऊन वाढत्या वयानुसार समभागाचा [इक्विटीचा] कमीकमी केला जातो. स्वत:ची जोखीम स्वीकारण्याची क्षमता बघूनच गुंतवणूकदाराने निर्णय घेणे अपेक्षित आहे. तीनही पर्यायांचे मिश्रण स्वीकारण्याचा आगळावेगळा पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

योजनेचे निधी व्यवस्थापक म्हणून सात संस्थांची नेमणूक सरकारने केली आहे. त्यात एल आय सीपेन्शन फंड, युटीआयरिटायरमेंट सोलूशन्स, एस बी आय पेन्शन फंड्स, कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, रिलायन्स कॅपिटल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लाईफइन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या खात्यात नामांकनाची सुविधा आहे. टियर-1 खाते उघडण्यासाठी बँक खाते आवश्यक नसते. पण टियर -2खाते उघडण्यासाठी बँक खाते अनिवार्य आहे.

या योजनेतील गुंतवणूक आयकर कलम ८० सी अन्वये करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र ठरते. परंतु ही योजना ‘ईईटी’ [Exempt, Exempt &Tax] प्रकारातील असल्याने जमा केलेली रक्कम आणि त्यावरील लाभ करमुक्त ठरतो. पण मुदतपूर्ती समयी त्यावर करदायित्व येते. म्युचुअल फंडांच्या पेन्शन फंडांप्रमाणे सहजपणे रक्कम काढता येत नाही. तसेच पेन्शन फंडांची मुदतपूर्ती करमुक्त ठरते. ज्यांना निवृती पश्चात पेन्शनची सुविधा नाही, अशानी राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि किंवा म्युच्युअल फंडांचे पेन्शन फंड जवळ केलेच पाहिजेत.

आपल्याला स्वतःची आर्थिक उद्दीष्ट कळली, की त्या उद्दीष्टपूर्तीसाठी निश्चित केलेल्या अवधीसाठी किती  उत्पन्नदर अपेक्षित आहे. तसेच त्या उत्पन्नदरानं उद्दिष्टीत रक्कम मिळण्यासाठी दरमहा किती रक्कम गुंतवणं आवश्यक आहे ते जाणून घेणं आवश्यक ठरतं. यासाठीच म्युचुअल फंडच्या योजनांमधील पेन्शन फंडांत नियोजनबद्ध गुंतवणूक मार्ग (सिस्टमटिक इन्वेस्ट्मेंटप्लॅन) म्हणजेच ‘एसआयपी’ उपयुक्त ठरतो यात नियमित कालावधीत निश्चित केलेली रक्कम ठरवलेल्या अवधीसाठी (किमान सहामहिन्यांपासून अगदी २५-३० वर्षापर्यंत) गुंतवली जाते. रूपयाच्या मूल्याच्या सरासरीकरणामुळे (रूपी कॉस्ट अँव्हरेजिंग) गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी पडते.

क्रमशः”
 

Continue reading

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा पीए गोळीबारात ठार! कारचालकही जखमी!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री उशिरा ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला....

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिगत मेट्रो स्थानकात आग

मुंबई मेट्रो लाईन ३ (अ‍ॅक्वा लाईन)च्या 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' या भूमिगत स्थानकावर बुधवारी सायंकाळी आगीची मोठी घटना घडली. स्थानकाच्या तांत्रिक विभागातील सरकत्या जिन्याजवळ अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन...

शशी शेखर वेम्पती सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ६ मे २०२६ रोजीच्या अधिसूचनेत ही घोषणा केली. शशी शेखर वेम्पति हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन...
Skip to content