HomeArchiveभविष्यातील उत्पन्नाचा पर्याय...

भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स भाग-3

Details
भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स भाग-3

    13-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनायक कुळकर्णी ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेश्यक
vvskul@yahoo.com

समजा जर तुम्ही दरमहा एक हजार रूपये म्युच्युअल फंड योजनेत गुंतवत आहात. प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेस असलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्यास म्हणजे नेट अॅसेट वॅल्यूला [NAV] त्या एक हजार रूपयातून युनिट्सची खरेदी होते. शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे बदलणार्‍या निव्वळ मालमत्ता मूल्यातील बदलांमुळे त्या प्रत्येक एक हजार रूपयांमध्ये खरेदी झालेल्या युनिट्सच्या संख्येतही फरक पडतो. जर निव्वळ मालमत्ता मूल्य जास्त असेल तर खरेदी केलेल्या युनिट्सची संख्या कमी असेल. परंतु हेच निव्वळ मालमत्ता मूल्य कमी असेल तर खरेदी केलेल्या युनिट्सची संख्या अधिक असेल. जितक्या प्रदीर्घ अवधीसाठी ही योजना असेल तितक्या कालावधीत चक्रवाढ पद्धतीनं नफ्यावर नफा वाढत जातो. समजा ‘अ’ व्यक्तीनं दहा हजार रुपये २० वर्षांसाठी गुंतवले. जर गुंतवणुकीवरील सरासरी उत्पन्न दर वार्षिक १५ % येत असेल तर त्याची गुंतवणूक एक लाख ६२ हजार रूपये होईल. पण ‘ब’ व्यक्तिनं ‘अ’ची कृती बघून दहा वर्षांनंतर `अ’च्या गुंतवणुकीच्या दुप्पट म्हणजेच २० हजार रुपये त्या योजनेत गुंतवले परंतु त्याला पुढील १० वर्षात ८० हजार ९०० रूपयेच मिळतील. त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे ‘अ’ने दहा वर्षे आधी सुरवात केली असल्यानं प्रदीर्घ काळात गुंतवणुकीची वृद्धी चांगली झाली. नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेद्वारे [SIP] जर दरमहा एक हजार रूपयांची गुंतवणूक दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस, आणि पस्तीस वर्षांसाठी केली असता अंदाजे संचयित वार्षिक वृद्धी दर दहा टक्के प्रति वर्ष गृहीत धरला तर मुदतपूर्ती समयी अनुक्रमे २,३४,२४४ रू., ४,५४,४२४ रू., ८,०९,०२६ रू., १३,८०,११६ रू., २२,९९,८६३ रू., आणि ३७,८१,१२४ रू. एवढी रक्कम तयार होऊ शकते.

पेन्शन फंडाची अंदाजे १०% व्याज दराने वृद्धी झाल्यास मिळणारे पेन्शन उत्पन्न पुढील तक्त्यात दर्शविले आहे.

मासिक वर्गणी                   गुंतवणूक अवधी    
   (रू.) १० वर्षे २० वर्षे ३० वर्षे ४० वर्षे
         दरमहा अंदाजित पेन्शन ( रू.)  
५०० ९३४ २,८८६ ८,२९० २२,३०६
१००० १,८६८ ५,७७३ १६,५८१ ४४,६१२
२००० ३,७३६ ११,५४६ ३३,१६१ ८९,२२४

 अशाच प्रकारच्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेद्वारे जशी मोठी गुंतवणूक निर्माण होते. तशाच प्रकारे भविष्यात दरमहा पेन्शनसारखं उत्पन्नसुद्धा प्राप्त करणं शक्य ठरू शकतं. त्यासाठीच नियोजनबद्ध गुंतवणूक पेन्शन फंडात होणे आवश्यक असते. युटीआय रिटायरमेंट बेनिफिट पेन्शन फंड, टाटा रिटायरमेंट सेविंग्जफंड, टेंपलटण इंडिया पेन्शन फंड, एच डि एफ सी  रिटायरमेंट सोल्यूशन्स फंड, रिलायन्स पेन्शन फंड इत्यादी पेन्शन फंड्स आज उपलब्ध असून आयकर कलाम ८० सी अन्वये करपात्र उत्पन्नातून १,५०,००० रूपयांपर्यन्त वजावट यातील काही फंड्सवर उपलब्ध आहे.”
 

Continue reading

शशी शेखर वेम्पती सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ६ मे २०२६ रोजीच्या अधिसूचनेत ही घोषणा केली. शशी शेखर वेम्पति हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीला मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये पाक अतिरेक्यांनी तेथली पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुलाबा येथील 'ताज...

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...
Skip to content