HomeArchiveभविष्यातील उत्पन्नाचा पर्याय...

भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स

Details
भविष्यातील उत्पन्नाचा पर्याय राष्ट्रीय पेन्शन योजना [NPS] आणि पेन्शन फंड्स

    11-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनायक कुळकर्णी ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेश्यक

vvskul@yahoo.com

To say goodbye to tension in retirement, you should say hello to pension. ही उक्ती कोणीतरी सहज सांगून गेला आहे. पण खूपच मोठा अर्थ त्यात दडला आहे. एक जानेवारी २००४ पासून केंद्र आणि राज्य सरकारात नोकरीस लागलेल्याना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यातून [GPF Account] देण्यात येणारा पेन्शनचा लाभ वजा केला गेला. या सरकारी कर्मचार्‍यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना [National Pension Scheme] अनिवार्य केली आहे. अर्थात या योजनेत इतर पगारदार-व्यावसायिकही सामील होऊ शकतात. ही योजना निश्चित केलेल्या वर्गणीच्या तत्त्वावर असून तिचे दोन प्रकार आहेत- टियर-1 आणि टियर-2. सरकारी कर्मचारी त्यांच्या वयाच्या साठीनंतर “टियर-1” प्रकारातून मुक्त होऊ शकतील. परंतु त्यांच्या या राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यातील एकूण जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढून घेऊन उर्वरित चाळीस टक्के रक्कम वर्षासनाची रक्कम [Annuity Amount] दरमहा मिळण्यासाठी आयुर्विमा कंपनीकडे गुंतवणे बंधनकारक आहे. वयाची साठी पूर्ण होण्याआधी जर या खात्यातून बाहेर पडायचे असेल तर एकूण जमा रकमेच्या ८० टक्के रक्कम वर्षासनाची रक्कम [Annuity Amount] दरमहा मिळण्यासाठी आयुर्विमा कंपनीकडे गुंतवणे बंधनकारक आहे. टियर-1 प्रकारात मूळ पगाराच्या दहा टक्के रक्कम कर्मचार्‍याने जमा करणे अनिवार्य असून तेवढीच रक्कम सरकार त्या खात्यात जमा करते. हीच रक्कम मध्येच काढता न येणार्‍या पेन्शन टियर-1 खात्यात राखून ठेवली जाते.

“टियर-2” यातस्वेच्छेने खात्यातील रक्कम कधीही काढण्याची सुविधाआहे. परंतु या खात्यात सरकारकडून कोणत्याही प्रकारचा हिस्सा जमा केला जात नाही. प्रत्येक आर्थिक वर्ष अखेरीस किमान २००० रूपयांची शिल्लक असणे आवश्यक आहे. सरकारकडून जरी ही योजना आणली असली तरीही नेमकीकिती पेन्शन कोणत्या वार्षिक व्याज दराने प्राप्त होणार याची हमी दिलेली नाही. कोणीही भारतीय निवासी व्यक्ती की जिचे वय १८ ते  ६० वर्षे दरम्यान आहेअशा व्यक्ती हे खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठीचा खर्च आणि प्राण क्रमांक [PRAN-Permanent Retirement Account Number]मिळण्यासाठी ५० रूपयेतर प्रारंभाची नोंदणी आणि वर्गणी शुल्क म्हणून १०० रूपये द्यावे लागतात. या खात्यावर वार्षिक देखभाल शुल्क २२५ रूपये आकारले जात असून प्रत्येक व्यवहारासाठी किंवारक्कम जमा करतेसमयी ५ रूपयेआकारले जातात. वार्षिक निधी व्यवस्थापन शुल्क[FundManagement Charge] म्हणून निधी मूल्याच्या ०.२५% तर निधी मूल्याच्या ०.००७५% ते ०.०५% वार्षिक साठवणूक शुल्क [CustodianCharge] म्हणून  आकारले जाते. किमान गुंतवणूक १००० रूपये खाते उघडताना आवश्यक असून किमान ६००० रूपये दर वर्षी जमा होणे बंधनकारक आहे.

भाग-2″
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content