HomeArchiveबोलीभाषा एकांकिका स्पर्धेत...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘बिराड’ प्रथम!

Details
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘बिराड’ प्रथम!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

गजानन तुपे, वरिष्ठ रंगकर्मी
[email protected]
बहुचर्चित बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. मुंबईतल्या बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ही अंतिम फेरी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. त्यामध्ये वऱ्हाडी भाषेतील “बिराड” ही एकांकिका स्पर्धेत प्रथम आली तर अहिराणी भाषेतील “पडस का?” या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. नगरी (अहमदनगर) भाषेतील “रंगबावरी” तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध बोलीभाषेतील चाळीस एकांकिकांच्या प्राथमिक फेरीनंतर अंतिम फेरीसाठी नऊ एकांकिकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीतील नऊ एकांकिका एकाहून एक सरस सादरीकरणाने जबरदस्त गाजल्या. कथानकाचे वेगवेगळे विषय, त्यातील आशयघनता एकांकिकेच्या विषयानुरूप दिलेले संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, लेखन, दिग्दर्शन या वर्गवारीत स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. सर्वच एकांकिकांचे सादरीकरण अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे होते.
 
महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे जतन व्हावे आणि संवर्धन व्हावे या भाषेतील गोडवा, लय, त्यातील लकबी आणि त्या-त्या बोलीभाषेची समृद्धता लोकांपर्यंत पोहोचावी आणि ग्रामीण भागातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळावं, नवोदित रंगकर्मींना मूळ प्रवाहाची ओळख व्हावी या उद्देशाने या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. सुप्रिया प्रॉडक्शनच्या गोविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया चव्हाण यांनी या स्पर्धेचे शिस्तबद्ध आयोजन केले होते. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अभिनेता सुदेश म्हशीलकर आणि भारत सावले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर अंतिम फेरीसाठी ज्येष्ठ अभिनेते, प्रमोद पवार यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.
 
स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल
एकांकिका:- १) “बिराड”, कलांश थिएटर्स, रत्नागिरी
२) “पडस का?”, अत्रेय, अंबरनाथ.
३) “रंगबावरी”, नाट्य मल्हार, अहमदनगर.
दिग्दर्शक:- १) अजिंक्य कोल्हाटकर, मनोज भिसे, एकांकिका:- बिराड
२) अनुप माने, एकांकिका:- पडस का?
३) संदीप पोपट दंडवते, एकांकिका:- रंगबावरी.
लेखक:- १) शंतनु चंद्रात्रे, एकांकिका:- पडस का?
२) अजिंक्य कोल्हाटकर, एकांकिका:- बिराड
३) मोहन बनसोडे, एकांकिका:- चकवा
अभिनेता:- १) चेतन फड, एकांकिका:- पडस का?
२) स्वप्निल हिंगडे, एकांकिका – डॉल्बी वाजलं की धडधड
३) महेश गुरव, एकांकिका:- बिराड.
अभिनेत्री:- १) अश्विनी आंचवले, एकांकिका:- रंगबावरी
२) अक्षता सामंत, एकांकिका:- पडस का?
३) सुप्रिया लाड, एकांकिका:- बिराड

विनोदी अभिनेत्री:- १) दीपा माळकर, एकांकिका:- बायल करी घायल
२) रूपाली मुनोत, एकांकिका:- रंगबावरी
३) मोहीनी चव्हाण, एकांकिका:- कडुतात्या
विनोदी अभिनेता:- १) सचिन वळूंज एकांकिका:- बायल करी घायल
२) गणेश मुंढे, एकांकिका:- कडुतात्या
३) सुजल शेळके, एकांकिका:- रंगबावरी
पार्श्वसंगीत :- १) शुभम घोडके, संकेत जगदाळे एकांकिका:- रंगबावरी
२) निनाद म्हैसाळकर, एकांकिका :- बिराड
नेपथ्य:- १) देवाशिष भरवडे, एकांकिका:- बिराड
२) ज्ञानसाधना नाट्य परिवार एकांकिका :- चकवा
प्रकाशयोजना:- १) समीर सावंत, एकांकिका:- बिराड
२) मुन्ना सय्यद, एकांकिका :- रंगबावरी
वेशभूषा:- १) अक्षय कोळवणकर, एकांकिका:- बिराड
२) वैभव राजेंद्र वाघ, एकांकिका :- हालगी सम्राट
रंगभूषा:- १) तेजश्री पिळणकर, एकांकिका:- बिराड
२) सुनील परदेशी, एकांकिका :- हालगी सम्राट
वाचिक अभिनय:- निरजा वर्तक एकांकिका:- निवेद
विनोदी लेखन:- राजेश कोळंबकर एकांकिका:- बायल करी घायल”
 
“गजानन तुपे, वरिष्ठ रंगकर्मी

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content