HomeArchiveबेस्ट भाडेकपातीचे मन:पूर्वक...

बेस्ट भाडेकपातीचे मन:पूर्वक स्वागत!

Details
बेस्ट भाडेकपातीचे मन:पूर्वक स्वागत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
बेस्ट ही मुंबईकरांसाठी मस्ट आहे. रोज लाखो प्रवासी बेस्ट बसेसमधून प्रवास करतात. त्यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक गटातील नागरिकांचा समावेश असतो. वर्षानुवर्षे बेस्ट बस ही देशभरात `बेस्ट’ ठरली आहे. बेस्ट उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून सदैव झाले आहे. मुंबईची लोकल आणि मुंबईची बेस्ट बस या मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. पण अशी ही बेस्ट गेले काही वर्षे तोट्यात चालली होती. हा तोटा भरून निघणे आवश्यक होते. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात होत्या. त्यात भाडेवाढ ही अत्यंत अप्रिय उपाययोजनादेखील होती. नाईलाजाने सर्वसामान्य बेस्ट प्रवाशांकडून अधिक भाडे घेतले जात होते. मुंबईकरांना ते परवडणारे नव्हते. साहजिकच अनेकांनी बेस्ट बसेसमधून प्रवास करणेच सोडून दिले. जवळच्या प्रवासासाठी दुचाकी अथवा रिक्षाचा वापर मुंबईकर करू लागले. पण गेल्या सोमवारी राज्यशासनाने मुंबईकरांना सुखद धक्का दिला. बेस्ट भाडेकपातीला राज्यशासनाने हिरवा कंदील दाखविला. परिणामी, मंगळवारपासून बेस्ट भाडेकपात लागू झाली. त्यामुळे बेस्ट थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसू लागला.

बेस्टचा प्रवास फक्त पाच रुपयांत! अशा घोषणा प्रवाशांच्या कानावर पडल्या आणि त्यांनी बेस्ट बसकडे धाव घेतली. त्यामुळे बेस्टच्या गाड्या प्रवाशांनी भरून जाताना दिसू लागल्या. या बेस्ट भाडेकपातीबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानणे आवश्यक आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळेच मुंबईकरांना पावसाळ्यात बेस्टने ही मोठी भेट दिली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्टला आर्थिक मदतीची गरज होती. मुंबई महापालिकेने बेस्टला तब्बल रू. 600 कोटींची मदत करून या उपक्रमाला संजीवनी दिली. मात्र असे करत असताना महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला काही अटी आणि शर्तीदेखील घातल्या. या अटी आणि शर्तीमध्ये बेस्टचे किमान भाडे पाच रूपये करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला देण्यात आले. सारांश, मुंबई महापालिकेमुळेच स्वस्त बेस्ट प्रवास मुंबईकरांना लाभला आहे. याबद्दल महापालिकेचे कर्तबगार आयुक्त प्रवीण परदेशी यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. मुंबईकर प्रवीण परदेशी यांचे ऋणी आहेत.

बेस्ट भाडेकपातीमुळे बेस्ट प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी बेस्टला जो तुफान प्रतिसाद दिला त्यावरून हे दिसून आले. मात्र त्याचबरोबर बेस्ट प्रशासनाची जबाबदारीदेखील वाढणार आहे. बेस्टचे प्रवासी टिकवायचे असतील तर बेस्टला नियमित बसफेऱ्या वाढवाव्या लागतील. जे बेस्ट मार्ग बंद केले आहेत ते पुन्हा सुरू करावे लागतील. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्टचा लाभ होईल. भाडेवाढीमुळे बेस्ट आणि मुंबईकर यांच्यात अंतर पडल्यामुळेच मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाचालकांचे फावले होते. मुंबईकरांना अक्षरश: नाडले जात होते. त्यांना लुटले जात होते. पण आता मुबलक दरात प्रवास करणे मुंबईकरांना शक्य होणार आहे. बेस्टचे भाडे परवडणारे नसल्यामुळेच लोक नजीकचा प्रवास करण्यासाठी दुचाकी काढायचे किंवा पायी जायचे. पण आता ते नक्कीच बेस्टचा वापर करतील. मुंबईकर भगिनी बाजारात किंवा मुलांना शाळेत सोडण्याकरिता टॅक्सी आणि रिक्षाचा आधार घेत होत्या. पण आता त्यादेखील बेस्टकडे वळतील. बेस्टने नियमित गाड्यांसह मुबलक सुट्ट्या पैशांचीदेखील व्यवस्था केली पाहिजे. आम्हाला खात्री आहे की, बेस्टचा प्रवास हा आमच्या लहानपणी होता तसा येथून पुढेही `बेस्ट’ असेल.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content