HomeArchiveप्रियांकांचे झटपट आंदोलन!

प्रियांकांचे झटपट आंदोलन!

Details
प्रियांकांचे झटपट आंदोलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
प्रियांका बेटी आँधी है, नई इंदिरा गांधी है अशा घोषणा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये दिल्या जात होत्या. त्या आता थोड्या थोड्या खऱ्या होताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात प्रियांका यांनी ज्या पद्धतीने तत्काळ धरणे आंदोलन सुरू केले त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी आली आहे. जिवात जीव आला आहे. त्याचवेळी प्रियांकांनी आंदोलनाचा हा जो नवा प्रघात पाडला त्याने भारतीय जनता पक्षाला विचारात पाडले असल्यास नवल नाही. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी तीन-चार महिने प्रियांका गांधी वाड्रा यांचे मन वळवले आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्व विभागाची जबाबदारी सोपवली. त्या सरचिटणीसही झाल्या, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना असेच उत्साहाचे भरते आले होते आणि त्यांनी प्रियांका गांधी म्हणजेच इंदिरा गांधींचा नवा अवतार आहे अशा प्रकारच्या घोषणा सुरू केल्या होत्या.

प्रियांका यांचे वागणे, बोलणे, हसणे व चालणे हे सारे त्यांच्या जगप्रसिद्ध आजीसारखे आहे यात कोणालाच शंका नाही. इंदिरा गांधीची सहज आठवण यावी असाच पोषाखही प्रियांका जाणीवपूर्वक करत असतात. पण आजीसारखा धूर्तपणा व राजकारणाची समज त्यांच्याकडे असल्याचे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. त्यांनी धरणे आंदोलनासाठी जो विषय निवडला तोही महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाला लागून असणाऱ्या मिर्जापूर महसुली विभागातील सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून आदिवासींची कत्तल झाली. सोनभद्र जवळच्या घोरावल गावातील हा प्रकार फक्त 90 बिघा जमिनीवरून घडला. सोनभद्र हा उत्तर प्रदेशातील क्रमांक दोनचा सर्वात मोठा जिल्हा आहे. दुसरे वैशिष्ट्य, म्हणजे हा उत्तर प्रदेशाचा सीमावर्ती जिल्हा आहे. म्हणजे थेट चार राज्यांना सोनभद्रच्या सीमा भिडलेल्या आहेत. एकीकडे मध्य प्रदेश दुसरीकडे छत्तीसगड, झारखंड आणि तिसरीकडे बिहार यांच्या सीमा या जिल्हयाला चिकटून आहेत.

मध्य प्रदेशातली एका आयएएस अधिकाऱ्याची ही जमीन होती. त्याने ती घोरावलच्या सरपंचालाच विकली. ही जमीन बरीच वर्षे वादातच होती. गोंड आदिवासींचा त्यावर हक्क सांगितला जात होता. उत्तर प्रदेशाच्या अलिकडच्या इतिहासात जमिनीच्या मालकीच्या वादातून इतके मोठे हत्त्याकांड घडलेले नाही. घोरावल गावाचा सरपंच योग्यभद्र याला जमीन विकण्याचा व्यवहारच आता संशयास्पद ठरला आहे. त्यादिवशी हा सरपंच योग्यभद्र दहा बारा ट्रॅक्टर भरून माणसे, हत्यारे घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेला तेव्हा तिथे संघर्ष झाला. सरपंचाने व त्याच्या साथीदाराने गोळीबार केला. त्यात गोंड आदिवासींपैकी दहा व्यक्ती मरण पावल्या. त्यात तीन महिलाही आहेत. हा प्रकार हादरवणारा होताच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत राज्यातील कायदा सुव्यवस्था संपली असा ओरडा विरोधी समाजवादी पार्टीने लगेचच सुरू केला. दुसऱ्याच दिवशी लखनौमध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. त्यामुळे त्यांना आयताच विषय मिळाला. त्यांनी लखनौमध्ये विधानसभेच्या आवारातच धरणे धरून योगींच्या राजवटीत आदिवासींच्या जमिनी बळकावण्यासाठी हत्त्याकांडे होत आहेत हा मुद्दा तापवला. या हत्याकांडात 18 जखमी गोंड मंडळी सोनभद्रच्या जिल्हा रूग्णालयात दाखल आहेत. या जखमींना तसेच मृतांच्या नातलगांना भेटण्यासाठी म्हणून प्रियांका गांधी या वाराणसी विमानतळावरून मिर्जापूरकडे रवाना झाल्या. त्या पुढे सोनभद्रला जाणार होत्या. या साऱ्या प्रकरणातली वाढते राजकारण व तापलेले सामाजिक वातावरण पाहून प्रशासनाने त्यांना तिथे जाण्यासाठी मनाई केली. हा मनाई आदेश मिर्जापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला तेव्हा प्रियांका गांधी वाड्रा यांनी तत्काळ तिथेच जमिनीवर बैठक मारली. मी परत जाणार नाही मला जखमींना तसेच मृतांच्या नातलगांना भेटायचेच आहे हा त्यांचा हट्ट होता.

प्रियांका गांधीं या काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्या तर आहेतच पण त्याही आधी त्या दिवंगत पंतप्रधानांच्या कन्या आहेत. राजीव गांधींच्या सर्व कुटुंबालाच एसपीजीचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफा कमांडोंची सुरुक्षा हा सारा लवाजमा असतोच. प्रियांका यांनी आंदोलन सुरू केल्यावर ते लगेचच पसरले. काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयांतून सर्व प्रदेश काँग्रेस कमिट्यांना आदेश गेले की आंदोलने सुरू करा. ठिकठिकाणी काँग्रेसवाले रस्त्यात उतरले. निदान फोटो काढून घेण्यासाठी आणि टीव्हीवर झळकण्यासाठी तरी कार्यकर्ते काँग्रेसला लाभले हाही मोठाच फायदा त्या हत्त्याकांडाचा झाला. सोनभद्रमधील प्रकारातील आदिवासी विरूद्ध गैर आदिवासी हा तणाव वाढू शकतो याची कल्पना असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी सोनभद्रकडे जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. ज्यादिवशी प्रियांका यांनी आंदोलन सुरू केले त्याचदिवशी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही तोच विषय उचलला होता. त्यांचे चार खासदार सोनभद्रकडे जाण्यासाठी वाराणसी विमानतळावर पोहोचले होते. त्यांना तिथेच पोलिसांनी अडवले. तेही धरणे धरून विमानतळावरच बसले. समाजवादी पार्टीनेही निदर्शने केली. पण जसा प्रियांकांना प्रतिसाद मिळला तसा तो इतर कोणत्याच पक्षाला वा नेत्यांना लाभला नाही असे का झाले असेल याचाही विचार सत्तारूढ आणि विरोध पक्षात केला जात असणे सहाजिकच आहे.

योगी आदित्यनाथांनी हत्त्याकांडाची तातडीने दखल घेतली व राज्याच्या पोलीस प्रमुखांना सक्त कारवाईचे आदेश लगेचच दिले होते. एकूण 61 ज्ञात अज्ञात आरोपींवर पोलिसांनी खटला भरायचे ठरवले आहे. त्यातील 24 गावकऱ्यांना पकडण्यात आले आहे. अद्याप 11 लोक फरारी आहेत. सरपंचाचे पुतणे, मुले आदी पकडले गेले आहेत. तो स्वतः फरारी आहे. दहा, बारा ट्रॅक्टर भरून गाववाले तिकडे गेले तेव्हा गोंड मंडळीही विरोधासाठी तयारीतच होती. यावरून हेच दिसते की हे प्रकरण आधीपासूनच धुमसत होते. चिघळत होते. आता ती जमीनच सरकारजमा करण्याची प्रक्रिया विभागीय आयुक्तांनी सुरू केली आहे. ती विकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे. आदिवासी हा काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. सरपंच, अन्य सधन गावकरी व त्यांच्या विरोधात नाडलेले आदिवासी हे कथानक काँग्रेसला पुढे जाण्याची संधी देणारे ठरू शकते. प्रियांका यांच्या तातडीच्या आंदोलनामुळे अनेक राज्यात मृतवत झालेल्या काँग्रेसला थोडी धुगधुगी आल्यासारखेही वाटत आहे. महाराष्ट्रात अंतर्गत संघर्षाने झाकोळून गेलेल्या प्रदेश काँग्रेसला अलिकडेच नवे अध्यक्ष व पाच कार्याध्यक्ष लाभले आहेत. प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्त्वाखाली यशोमती ठाकूर, नाना पटोले असे नेते मुंबईत रस्त्यावर उतरलेले दिसले. नाना आदींनी तर योगी आदित्यनाथांची छायाचित्रे पेटवून देत निषेध केला. हा निषेध प्रियांकांना अटकाव केल्याच्या विरोधात जसा होता तसाच तो आदिवासींवर भाजपा राज्यात झालेल्या अत्याचाराचाही होता. त्या आंदोलनाने काँग्रेसला देशभर बळ मिळाले आहे. आता राहुल गांधींच्या जागी प्रियांका यांना अध्यक्ष कराच, ही मागणी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जोर धरणार आहे. प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ आणि नंतर प्रियांका लाओ, देश बचाओ या मार्गाने ही वाटचाल सुरू राहणार आहे असे दिसते.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content