HomeArchiveपोखरणमध्ये होतेय वायूशक्ती...

पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

Details
पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगभरातून येणार दर्शक

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या वायू सेनेची ताकद गेल्या वर्षी ‘ऑपरेशन गगन भरारी’ने दाखवून दिल्यावर आता पुन्हा भारतीय वायू सेना येत्या शनिवारी आपल्या ताकदीचा परिचय करून देणार आहे. एक मोठा यद्धसराव सादर केला जाणार असून त्यात विविध प्रकारची १३० विमानं, हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत. जगभरातून अनेक पाहुणे येथे येणार असल्याने त्यांच्यासमोर हे कौशल्य दिसेल.

वायूशक्ती सरावात दिवसा, संध्याकाळी, रात्री युद्ध करण्याची वायू सेनेची ‘शक्ती’ सर्वांना समजेल. उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी पाचनंतर सुरू होणाऱ्या या चित्तथरारक कवायती दोन तास चालू राहतील. यात वायुसेनेची सुखोई-३०, मिग-२९, मिराज-२०००, जग्वार, मिग-२७, अशी आघाडीची लढाऊ विमानं सहभाग घेतील. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची तेजस-ऍडव्हान्स लाईट, हेलिकॉप्टर रुद्र आपला दमखम दाखवतील.

स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आकाश आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘अस्त्र’ हे या अभ्यासाचं आणखी एक आकर्षण आहे. सरावात सामील होणारी विमानं ही लगतच्या जैसलमेर, फलौदी, नाल, अंबाला, उत्तरलाई, आग्रा, जोधपूर या एअरबेसवरुन सामील होणार आहेत. दर तीन वर्षांनी भारतीय वायू सेना आपल्या युद्धहल्ल्याची क्षमता तपासत असते. यापूर्वी १९५४ पर्यंत दिल्ली जवळच्या तीलपत रेंजमध्ये ही प्रात्यक्षिके व्हायची. पण आता ती पोखरण येथे होतात.

दरम्यान, गेल्या बारा दिवसात दुसरे लढाऊ विमान अपघाती शिकार होऊन भंगारात गेल्याने वायू दलावर चिंतेचं सावट पसरले आहे. कारण, पुढील आठवड्यात बेंगळुरूजवळच्या येळहांका या एचएएलच्या विस्तीर्ण मैदानावर एरो स्पेस हा दर दोन वर्षांनी होणारा जागतिक शो सुरू होतोय. ऐन चार दिवस आधी मंगळवारी संध्याकाळी पोखरण रेंजवर, जैसलमेरच्या खेतोतोलाई फिल्डमध्ये मिग-२७ च्या कोसळण्याने डोकेदुखी वाढलीय. सोवियत संघ काळातील हे विमान १९८० साली खरेदी झाले होते. कारगिल युद्धात डोंगरावर लपून बसलेल्या शत्रू सैन्यावर हल्ला चढवून पाकड्या घुसखोर सैन्याचा बंदोबस्त करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पायलट सुरक्षित असून चौकशीचे आदेश वायुदलाने दिले आहेत. फ्लॅईंग कॉफीन म्हणून कुख्यात झालेल्या या विमानाची उड्डाणे २०१०पासून थांबवण्यात आली होती. या विमान अपघातांची मालिका २००१पासून सुरू होऊन १२ अपघातग्रस्त झाली. यानंतर या तुकडीला उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले गेले.

गेल्या बारा दिवसात दुसरे विमान जे अपघातग्रस्त झाले जे प्रशिक्षणासाठी गेले होते. एक फेब्रुवारी रोजी एचएएलच्या येळहांका तळावर झालेल्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते. एक तर विमानाच्या ढिगाऱ्यातच पॅराशूट असूनही पडला नि स्वर्गवासी झाला. मात्र, नेमक्या कारणांचा शोध लागला नसला तरी काहींच्या मते देखभाल तर काहींच्या मते पुरेशा तंत्रकौशल्याचा अभाव सांगितले जाते. घटनेची चौकशी चालू आहे.

शनिवारी होणाऱ्या वायूशक्तीच्या अभ्यासात एकूण १३७ नाना प्रकारची विमानं भाग घेतील. मिग२९-७, जग्वार-१७, सु-३०-२४, मिग-२७ सुधारित-११, मिग-२१ बिसेन-४, मिराज २०००-४, हॉक-८, तेजस-६, AN-३२-४, C 130-५, AEW&C-१, mi 17 v5 -१५, ALH MK IV-७, Mi35-३, RPA 4 अशांचा समावेश आहे.”
 
“जगभरातून येणार दर्शक

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content