HomeArchiveपाकचे शांततेसाठी आणखी...

पाकचे शांततेसाठी आणखी एक पाऊल!

Details
पाकचे शांततेसाठी आणखी एक पाऊल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
क्रिकेट वर्ल्ड कपचे इतके महत्त्व आपल्याला नाही. म्हणजे आहे. तिथले सारे सामने आपण आवर्जून पाहतो, पाहणारच आहोत. त्याचा आनंदही लुटूच. पण 16 जूनचे जे महत्त्व आहे ते अपरंपार आहे. त्यादिवशी इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाचा सामना पाकिस्तानी क्रिकेट संघाबरोबर होणार आहे! त्या सामन्यात आपण जिंकलो की नंतरच्या वर्ल्ड कपमध्ये काय झाले याची फारशी चर्चा आपण कोणी करणार नाही आणि जर त्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला तर आपण सारेच विराट सेनेच्या नावाने पुढचा काही काळ बोटं मोडत राहणार आहोत!

भारत विरूद्ध पाकिस्तान हा क्रिकेटचा सामना त्या देशात वा या देशात होऊच शकत नाही तो एखाद्या परकीय भूमीवरच घडावा लागतो. याचे कारण पाकने भारताच्या विरोधात इतक्या कुरापती केल्या आहेत, पाकभूमीचा वापर दहशतावदी घडवण्यासाठी व ते दहशतवादी भारताच्या अंगावर सोडण्यासाठी गेली तीन दशके सुरू ठेवला आहे. त्या त्रासाचा कडेलोट झाल्यानंतर गेली अनेक वर्षे भारताने क्रिकेट सामन्यांसाठी पाकवर बहिष्कारच टाकला आहे. भारत पाक सामन्यांची मालिका खेळवणे बंदच आहे. वर्ल्ड कप ही अशी स्पर्धा आहे की त्यातून पाकिस्तान वा भारत हे माघार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा जागतिक स्पर्धेतच फक्त भारताविरूद्ध लढण्याची व हरण्याची संधी पाक क्रिकेट संघाला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा पाकचे पंतप्रधान इम्रान खान हेही सध्याच्या वातावरणात ही बंदी उठवू शकत नाहीत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटमधून आपापले संघ हे नेते परतही घेऊ शकत नाहीत.

गेल्या सहा महिन्यांतील दहशतवादी घटनांचे सावट 16 जूनच्या सामन्यावर नक्कीच राहणार आहे. भारतामधून हजारो लोकांनी इंग्लंडमध्ये जाण्याचा व्हिसा काढलेला आहे. 16 जूनच्या त्या सामन्याची सारी तिकिटे संपलेलीच आहेत. पण भारतात पाकविरूद्धच्या क्रिकेट सामन्याचा जो एक जोश असतो, जे स्पिरीट असते तेच सीमेपलीकडेही आहेच. त्यामुळेच पाक कर्णधार सर्फराज अहमद यांनी पाकिस्तानी सरकारकडे एक पत्र पाठवले, परवानगी मागितली की भारताविरूद्धच्या 16 जूनच्या सामन्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू पाक लष्कराच्या टोप्या घालून मैदानात उतरण्याची परवानगी द्यावी. पाक कर्णधाराचा हा अगाऊपणाच होता आणि तसे झाले असते तर तो सामना कदाचित खेळवलाही गेला नसता. सर्फराजचे व त्याच्या सल्लागारांचे म्हणणे आहे की अशा पाक लष्करी टोप्या घालून आपण भारताच्या अशाच एका आधीच्या कृतीला उत्तर देऊया. भारतीय संघाने भारतीय भूमीवर, रांचीमध्ये, मार्चमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात मैदानात उतरताना भारतीय लष्कराच्या हिरव्या, खास लष्करी रंगातील टोप्या परिधान केल्या होत्या. पुलवामा इथे फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानी प्रेरणेने भारतीय सुरक्षा जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार बाँबचा स्फोट घडवून मोठा उत्पात घडवला होता. पाकिस्तानविरोधात देशभर संतापाची लाट उठलेली होती. त्या तणावाच्या व पाकिस्तानच्या विरोधातील वातावरणात भारतीय क्रिकेटपटूंनी त्या लष्करी टोप्या परिधान करून आपल्या दिवंगत जवानांना एकप्रकारे श्रद्धांजली अर्पण केली होती.

त्याशिवाय असेही होते की तो सामना भारतीय भूमीत झाला होता आणि ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील ती लढत होती. पण तरीही ते कृत्य पाकला तेव्हा पुष्कळच झोंबले होते. खरेतर पाकिस्तानविरूद्धच्या क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने तसे काही केले असते तर पाकने थयथयाट करणे एकवेळ समजू शकले असते. पण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ज्या टोप्या वापरल्या त्या विरोधात पाक क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडे – आयसीसीमध्ये तक्रार दाखल केली होती. भारतीय संघाच्या त्या लष्करी शिरस्त्राणाच्या विरोधात पाक क्रिकेट बोर्डाने आयसीसीमध्ये बराच थयथयाट केला होता. पण बीसीसीआयचाच लोगो त्या टोप्यांवर झळकलेला होता, भारतीय लष्कराचा फक्त रंग होता, टोप्या क्रिकेटच्याच होत्या यावर आयसीसीने शिक्कामोर्तब केले होते. शिवाय अशाप्रकारच्या नव्या टोप्या वापरण्याची रीतसर परवानगीही भारतीय क्रिकेट संघटनेने बीसीसीआयने त्या सामन्याच्या आधी मागितलेली होती. त्यामुळे पाकचा तो त्रागा फुकट गेला व त्यांना गप्पच बसावे लागले होते.

त्या प्रसंगाची पुनरावृत्ती करणारे पाकचे भारताच्या विरोधातील सामन्यात करण्याचे धाडस पाकला महागातच पडू शकले असते. स्वतः जगमान्य क्रिकेटपटू असणाऱ्या पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक कर्णधाराचा हा अगाऊपणा मान्य केला नाही हे बरेच झाले. इम्रान खान यांनी पाक संघाला बजावले की तुम्ही फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करा, बाकीच्या या भानगडी करू नका. पुलवामा घटनेनंतर भारतीय लष्कराने बालाकोटचे हवाई हल्ले चढवून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्या आठवणी पाक अद्यापी विसरलेला नाही. पुलवामा व नंतर बालाकोटमुळे दोन्ही देशांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता नवीन सरकारच्या स्थापनेनंतर थोडा उतार यावा, तणाव निवळावा, स्थिती पूर्ववत व्हावी, यासाठी सध्या पाक सरकार धडपड करत आहे. बालाकोटनंतर त्यांनी भारतीय विमानांना पाक हवाई हद्दीत प्रवेशबंदी लावली होती. ती बंदी खान सरकारने ईदच्या रात्री उठवली आहे. आता भारतीय भूमीवरून उड्डाण करणारी तसेच भारतात येणारी व्यापारी विमाने पाक हवाई हद्दीमधून येऊ लागलेली आहेत. तणाव निवळ्ण्याचे हे एक पाऊल मानले गेले असेल तर पाक क्रिकेटपटूंना लष्करी टोप्या परिधान करू देण्यास पाक पंतप्रधानांनी दिलेला नकार हे शांततेसाठी टाकलेले दुसरे पाऊल आहे, असेच म्हणावे लागेल.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content