HomeArchiveनौदल गोदीत तयार...

नौदल गोदीत तयार झाली तपासणी बंदूक!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“संपूर्ण विश्व व्यापून असलेला कोरोना हा प्राणघातक आजार तापासह येतो हे उघड झाले आहे. प्राथमिक पातळीवर त्या रूग्णाच्या जवळ जाऊन ताप तपासावा लागतो. अन्यथा इन्फ्रा रेड प्रणालीवर चालणारी महागडी बंदूक वापरावी लागते. या पार्श्वभूमीवर हजारो लोकांची ये-जा असणाऱ्या गोदीसारख्या भागात हे मोठं आव्हानात्मक काम असेल. हे लक्षात घेऊन मुंबई नौदल गोदीच्या संशोधन विभागाने हातात सहज वापरता येईल, अशी इन्फ्रा रेड तंत्र वापरून तपासणी करता येईल अशी नि अन्य बंदुकांपेक्षा स्वस्त बंदूक विकसित करण्यात यश मिळवले आहे.”
 
“सध्या देशभरात लॉकडाऊन असला तरी देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील गोदीत काही कामं चालूच आहेत. जहाज बांधणीची काही कामं, प्रयोगशाळा, येथील कामांना वर्क फ्रॉम होम लागू नाही. त्यामुळे हा वर्ग गोदीत येत असतो. अशांच्या तापमान तपासणीसाठी लागणारा वेळ या या बंदुकीने वाचणार आहे नि दारावरील रक्षकांचा ताण कमी होणार आहे. या बंदुकीची किंमत बाजारभावापेक्षा कितीतरी कमी असल्याचे नौदल प्रवक्ते कमांडर मेहुल कर्णिक यांनी स्पष्ट केले.”
 
 
 
“कोविड 19 च्या काळात संसर्गित रूग्णसंख्या पाहता जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येऊन चाचण्या आवश्यक झाल्यात. देशात २८५ वर्षं इतक्या जुन्या असलेल्या या गोदीत दररोज वीस हजारांहून अधिक लोकांची ये-जा असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही चाचण्या करूनच संबंधितांना आत प्रवेश दिला जातो. पश्चिम नौदल ताफ्यातील जहाजावरील अधिकारी, सैनिक यांच्यासह आवश्यक वर्ग आत येत असतो. त्यांचं नेमकं तापमान शरीराशी संपर्क न येता या छोटेखानी बंदुकीमुळे तपासता येईल.”
 
“या आजाराचा प्रसार वाढताच बाजारात असलेल्या अशा बंदुकीची किंमत खूपच वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतही वाढली असल्याने नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमीटर किंवा टेम्परेचर गनच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. यावर मात करण्यासाठी नेव्हल डॉकयार्डने गरज लक्षात घेऊन स्वतः याची विकसित आवृत्ती तयार केली. याची अचूकता 0.02 डिग्री सेल्सिअस इतकी आहे, असे कर्णिक यांनी सांगितले.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content