HomeArchiveनौदलाच्या ताफ्यात स्वदेशी...

नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी टॉरपेडो डेकॉय प्रणाली!

Details

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्ध जहाजांवरून पाणबुडीविरोधी गोळीबार करण्यास सक्षम असलेली प्रगत टॉरपेडो डेकॉय प्रणाली मारीचला एका करारांतर्गत समाविष्ट करत नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. ही अँटी-टॉरपेडो डेकॉय सिस्टम स्वदेशी डीआरडीओ प्रयोगशाळांमध्ये (एनएसटीएल आणि एनपीओएल) तयार आणि विकसित करण्यात आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम असून या डेकोय प्रणालीचे उत्पादन हाती घेईल. या प्रणालीची चाचणी घेण्यात आली असून त्याने सर्व मूल्यांकन निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. नौदलाच्या आवश्यक पात्रतेनुसार त्याची वैशिष्ट्ये सिध्द केली आहेत.

नौदलाच्या ताफ्यात टॉरपेडो डेकोय प्रणालीचा समावेश संरक्षण तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासासाठी भारतीय नौदल आणि डीआरडीओचा संयुक्त संकल्प असून सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रम आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये ‘आत्मनिर्भर’ महत्त्वपूर्ण आहे.
 
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content