HomeArchiveनेक्स्ट एज्युकेशनचे व्हर्च्युअल...

नेक्स्ट एज्युकेशनचे व्हर्च्युअल स्कूल समाधान!

Details
 
 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत भारतातील अग्रगण्य शिक्षण समाधान प्रदाता नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा. लि.ने शाळांची मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिक्षणाची प्रक्रिया ऑफलाइनवरून ऑनलाइनवर आणण्याकरिता नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, दूरवरून शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक प्रक्रिया सूरळीत चालू राहण्यासाठी ‘स्कूल इन अ बॉक्स’ सोल्युशन हा सर्वसमावेशक पर्याय उपलब्ध करून दिली आहे.”
 
“नेक्स्ट एज्युकेशन ३० एप्रिल २०२० पर्यंत सर्व भागीदार शाळांसाठी फ्री सबस्क्रिप्शनची सुविधा देत आहे. केजी ते १२वीपर्यंतचे शैक्षणिक वातावरण अधिक संवादात्मक, सर्जनशील आणि आकर्षक बनवण्यासाठी नेक्स्ट एज्युकेशन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, नेक्स्ट ईआरपी, लाइव्ह लेक्चर्ससह नेक्स्ट एमएस, नेक्स्ट असेसमेंट, घरी राहून कंटेंट मिळवणे, संबंधित राज्याच्या बोर्डाचा कंटेंट स्थानिक तसेच विविध भाषांमध्ये उपलब्ध असणे आदी सुविधांचा लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये समावेश असेल.”

“लाइव्ह लेक्चर्सद्वारे शिक्षक दूरवरून शिकवण्याकरिता इंटरनेटचा वापर करून व्हर्च्युअल क्लासरूम तयार करू शकतात. विद्यार्थ्यांना यासंबंधी रिअलटाइम नोटीफिकेशन्स मिळतात तसेच रेकॉर्डेड सेशन्स त्यांना अनेकवेळा पाहताही येतात. शिक्षकांना ऑनलाइन डाउट सेशन्सही घेता येऊ शकतील. नेक्स्ट असेसमेंट हे अत्यंत शक्तीशाली टूल असून याद्वारे शिक्षक ऑटोमॅटिक असेसमेंट जनरेटरने असेसमेंट तयार करू शकतात. अडॅप्टीव्ह टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या फीडबॅकही देता येऊ शकतो. डिजिटल कंटेंट हा नेक्स्ट करिकुलम आणि टीचनेक्स्ट कंटेंटनी युक्त आहे. डिजिटल कंटेंट हा आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई आणि २९ स्टेट बोर्डाच्या ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे.”
 

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content