HomeArchiveधारावीच्या मंदिरातून गणपतीची...

धारावीच्या मंदिरातून गणपतीची दगडी मूर्ती चोरीला!

Details
धारावीच्या मंदिरातून गणपतीची दगडी मूर्ती चोरीला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धारावीकर त्रस्त असताना गल्लीबोळातील देवी-देवतांची मंदिरेसुद्धा असुरक्षित असल्याची घटना धारावी मेन रोडवरील कानडी चाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली आहे. दोन चोरटयांनी सोन्या-चांदीची नव्हे चक्क गणपतीची काळ्या दगडाची किंमती मूर्ती चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरात सलग दुसरी घटना घडल्याने धारावी पोलीस कुठे आहेत असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.

गेल्या महिन्यात एकाच रात्रीत अज्ञात चोरटयांनी तीन घरफोड्या करून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला. अज्ञात चोरटे अजूनही मोकाट असल्याने धारावी पोलिसांबाबत परिसरात नाराजी आहे. याप्रकरणी मंदिराचे मालक पत्रकार बाळा सुब्रमण्यम यांनी धारावी पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांचे कृत्य मंदिरालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत. कानडी चाळीत राहणाऱ्या पत्रकाराने दोन वर्षांपूर्वी तामिळनाडूतील देवळांचे महानगर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मदुराई येथून एक फुटाची काळ्या दगडाची गणपतीची मूर्ती ६५ हजार रूपये देऊन बनवून घेतली. मदुराईच्या एका प्रसिद्ध मंदिरातील पुजाऱ्यांकडून छोट्याशा मंदिरात विधिवत पूजा करून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. गणेशजयंतीला पूजा, आरती तसेच भंडारा होत असल्याने अल्पवधीत छोटेसे गणपती मंदिर विभागात प्रसिद्ध झाले. जागृत मूर्ती आकर्षक दिसत असल्याने ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
 
सोमवारी मध्यरात्री परिसरातील रहिवासी गाढ झोपेत असताना दोन अज्ञात चोरटे मंदिराबाहेरील लोखंडी गेटजवळ आले. त्यातील एकाने गेटवरून उडी मारून मंदिर परिसरात प्रवेश करत अवघ्या काही सेकंदात गणेशाची मूर्ती उचकटून गेटजवळ अंगावर पांघरूण घेऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या साथीदाराच्या हवाली करत पोबारा केला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका मुलाची नजर त्या अज्ञात चोरट्यांवर पडली. त्याने लागलीच बाळा यांना झोपेतून उठविले. बाळा यांनी मंदिराची पाहणी केली असता मूर्ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ धारावी पोलिसांना घटनेची माहिती दिली. गेल्या महिन्यात बाळा यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी हात साफ करून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला होता. सलग दुसरी घटना घडल्याने ते चिंतेत आहेत. छायाचित्रेः भूषण कोयंडे
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content