HomeArchiveदारूची दुकाने पुन्हा...

दारूची दुकाने पुन्हा बंद होणार?

Details
 
 
किरण हेगडे
Kiranhegde17@gmail.com

“आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये अगदी रेड झोनसह सर्व भागात दारूची दुकाने व कारखाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी त्यासाठी असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास किंवा यातून हफ्तेखोरीला ऊत आल्यास दारूची दुकाने बंद केल्यावाचून दुकानदारांसमोर पर्याय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया दारू विक्रेत्यांकडून मिळत आहे.”
 
“राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी जारी केलेल्या सीलबंद मद्दय विक्री करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये इतक्या जाचक अटी घातल्या आहेत की त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यासच दारूची दुकाने सुरू राहू शकतात. मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव महापालिका क्षेत्र वगळून दारूचे कारखाने सुरू होऊ शकतात. मात्र, यावेळी सर्व कामगारांची थर्मल चाचणी आवश्यक आहे. त्यापैकी कोणाला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असता कामा नयेत. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक अंतर कायम राखले पाहिजे.”
 
“दारूच्या घाऊक विक्रेत्यांनी सर्व झोनमध्ये आपली दुकाने चालू करण्यास हरकत नाही. मात्र, यातून रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळला जाईल. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही दुकाने बंद राहतील. त्यांना ५० टक्के कर्मचारी ठेवण्याची मुभा आहे. सर्व नोकरांची तसेच कामगारांची थर्मल स्क्रिनिंग आवश्यक करण्यात आली आहे. त्यांनाही कोणाला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास कामावर ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.”
 
“किरकोळ दारू विक्रेत्यांच्या अटी तर भलत्याच आहेत. त्यांनी फक्त सीलबंद दारूची बाटलीच विकावी. मॉल, बाजार संकुल तसेच बाजारातील दुकाने चालू करता येणार नाहीत. ती एकल असावीत. निवासी वस्तीत असावीत. दुकानासमोर एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक हजर असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असावे. त्यासाठी तशी वर्तुळे आखावीत. दुकानदाराने आपल्या नोकरांची तसेच ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग करावी. ज्या ग्राहकांना सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावा. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी हँड सॅनिटायझरची सोय करावी. हे सर्व करण्यासाठी लागणारा नोकरवर्ग दुकानदाराने नेमावा. सकाळी १० ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याला दुकान उघडे ठेवता येईल. मद्द्य बाळगणे व खरेदी करणे याच्या कायद्याचे उल्ल्घन होणार नाही, याची काळजी त्याने घ्यावी. तेथे कोणीही दारू पिणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये कोठेही कसूर आढळल्यास दुकान तत्काळ बंद केले जाईल.”
 
 
 
“प्रत्येक दुकानदाराने दुकानाबाहेर सहज दिसेल असा फलक लावावा. त्यावर, दुकानाच्या सुधारीत वेळा, एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक असू नये, सामाजिक अंतर पाळले जावे, मास्क अनिवार्य आहे. प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. ज्याला सर्दी, ताप, खोकला असेल त्याने दुकानात प्रवेश करू नये, दुकानात दारू पिता येणार नाही, परिसरात थुंकण्यास मनाई असेल, असा मजकूर लिहिलेला असावा. दुकानदारास गरज भासल्यास पोलीस उपलब्ध होतील, असे उत्पादन शुल्क खात्याने कळवले आहे. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांची काटोकोर अंमलबजावणी होणे गरजे असल्याचे म्हटले आहे.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content